मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:46 IST2025-04-09T15:25:27+5:302025-04-09T15:46:36+5:30

बीडमधील मस्साजोग गावातील आवादा कंपनीत १२ लाखांच्या केबलची चोरी झाली आहे.

Big news! Security deployed at Avada company in Massajog; Rs 12 lakhs stolen | मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी

मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन चार महिने उलटले. या हत्या प्रकरणामुळे आवादा ही कंपनी चर्चेत आली होती. आता याच आवादा कंपनीमध्ये १२ लाख रुपये किंमतीच्या केबलची चोरी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता आवादा कंपनीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे, कारण...; कोर्टाचा झटका, पोटगी देण्याचे आदेश

काही दिवसापूर्वी आवादा कंपनीमध्ये दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तोंडाला मास्क बांधून आवादा कंपनीमध्ये चोरीचा प्रयत्न केला. यावेळी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, यावेळी सुरक्षा रक्षकांना धमकात बारा लाख रुपये किंमतीच्या केबलची चोरी केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यामुळे आता आवादा कंपनीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. कंपनीला २४ तास सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी याच कंपनीमध्ये सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यात वाद झाला होता. या वादातून सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. आता याच कंपनीमध्ये पुन्हा चोरी झाल्याचे समोर आले. यामुळे आता कंपनीने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. 

अवादा एनर्जी कंपनीच्या गोदामतून ११ लाख २६ हजार रुपयाच्या कॉपरच्या केबलची चोरी झाली आसून सहाय्यक स्टोअर मॅनेजर आशुतोष जयराम सिंग यांच्या फिर्यादी वरून मंगळवारी अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

या प्रकरणी  तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक राकेश बनसोडे यांनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सीसीटीव्हीच्या फुटेजची मागणी केली आसता, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Big news! Security deployed at Avada company in Massajog; Rs 12 lakhs stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.