पंकजा मुंडेना होमग्राउंडमध्ये धक्का; सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा एकहाती विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 07:45 PM2022-11-03T19:45:03+5:302022-11-03T19:49:02+5:30
परली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी पांगरी-लिंबुटाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्व जागावर विजय मिळवला आहे.
परळी: तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी पांगरी-लिंबुटाच्या संचालक पदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे व व वाल्मीक कराड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागावर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने भाजप नेते फुलचंद कराड यांच्या मार्गदर्शनाखालील भाजप प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला आहे.
पांगरी लिंबुटा सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदाच्या 13 जागेसाठी एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 13 जागेसाठी बुधवारी 2 नोव्हेंबर रोजी पांगरी येथे मतदान झाले. मतदानानंतर दोन तासाने सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्व म्हणजे 13 उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
माजी मंत्री धनंजय मुंडे व व वाल्मीक कराड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलची धुरा राष्ट्वादीचे युवक कार्यकर्ते ऍडव्होकेट श्रीनिवास मुंडे यांनी यशस्वीरित्या सांभाळली, त्यामुळे या पॅनलला सहज विजय प्राप्त करता आला. अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार नंदकिशोर मुंडे यांनी दिली. या निवडणुकीत भाजपच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.
शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार:नंदकिशोर धोंडीराम मुंडे, व्यंकट दिंगाबर तिडके, मधुकर रामकृष्ण मुंडे, शांतीलाल गणपत मुंडे, महादेव नामदेव मुंडे, शिवाबाई संजीवन गित्ते, कुमार गुलाब काटूळे, राजेभाऊ बालासाहेब बनसोडे, मोहन लिंबाजी मुंडे, रमेश यडबाजी कराड,भागवत धोंडिबा मुंडे, कोंडीबा साहेबराव दिवटे, कुसुम दामोदर मुंडे.