दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकी पुलात पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:49+5:302021-04-20T04:34:49+5:30
गेवराई : तलवाडा ते रामपुरी रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामावर कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक नसल्यामुळे गोळेगावकडून गेवराईकडे ...
गेवराई : तलवाडा ते रामपुरी रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामावर कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक नसल्यामुळे गोळेगावकडून गेवराईकडे येणारी दुचाकी पुलाच्या खड्ड्यात पडून एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
गेवराई शहरातील संजय नगर येथील रेहान इम्रान पठाण व कोरबू गल्लीतील समीर अय्युब बागवान हे दोघे रविवारी दुचाकीवरून गोळेगाव शिवारात असलेल्या टरबुजाच्या शेतात चक्कर मारून रात्री नऊच्या सुमारास तलवाडा रोडने गेवराईकडे दुचाकीवरून येत होते. सध्या तलवाडा गेवराई या रोडवर पुलाचे काम सुरु आहे. परंतु या पुलाचे काम बंद असल्याने व पुलाजवळ कोणताही दिशादर्शक फलक लावला नसल्याने व पुलाचा खड्डा दिसला नसल्याने दुचाकी पुलाखाली गेली. ही घटना परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना पुलाबाहेर काढून या घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना दिली.
या अपघातात रेहान इम्रान पठाण (१९) ) यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर समीर अय्युब बागवान हे जखमी झाले असून, त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे. उशिरापर्यंत तलवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
===Photopath===
190421\sakharam shinde_img-20210419-wa0025_14.jpg