दुचाकीचोरीचे सत्र सुरुच; सहा दुचाकी चोरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:13+5:302021-06-30T04:22:13+5:30

बीड : जिल्ह्यात वाहन चोरांचीचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. पंधरा दिवसात विविध ठिकाणी सहा दुचाकी चोरीच्या घटना ...

Bike theft session continues; Six bikes were stolen | दुचाकीचोरीचे सत्र सुरुच; सहा दुचाकी चोरल्या

दुचाकीचोरीचे सत्र सुरुच; सहा दुचाकी चोरल्या

Next

बीड : जिल्ह्यात वाहन चोरांचीचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. पंधरा दिवसात विविध ठिकाणी सहा दुचाकी चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये बीड, नेकनूर, अंबाजोगाई शहर, दिंद्रुड, केज व परळी ग्रामीण हद्दीतील १४ ते २६ जूनच्या कालावधीतील चोरीच्या या घटना आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बीडच्या शिवाजीनगर ठाणे हद्दीतून २७ जून रोजी रोजी दीपक गायकवाड यांची दुचाकी (क्र.एम.एच.१२ सी.यु.२३००), चोरट्यांनी लंपास केली. दुसरी घटना केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील संदीपान कुटे यांची दुचाकी क्र.(एम.एच.४४ एन.३८४३) चोरट्यांनी २६ रोजी घरासमोरुन चोरून नेली. तर, तिसरी घटना नेकनुर हद्दीतील सूर्याचीवाडी येथील अनिल ढवळे यांची दुचाकी क्र.(एम.एच.२३ ए.क्यु.५९०४), चोरट्यांनी १४ रोजी मंदिरासमोरुन लंपास केली. दिंद्रुड हद्दीतील नित्रुड येथील बड्याचीवाडी शिवारातून देवीदास तिडके यांची दुचाकी क्र.(एम.एच.४४ एन.१८५४) २६ जूनच्या पहाटे चोरुन नेली. तर, परळी ग्रामीण हद्दीत राजेश सोनवणे यांची दुचाकी क्र.(एम.एच.४४ एल.९७५८) २२ जून रोजी घडली. चोरी झाली. दरम्यान, जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मोठी टोळी विविध ठिकाणी सक्रिय असल्याचे चित्र असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

दुचाकी परत मिळणे कठीण

दुचाकी चोरी गेल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास गेल्यावर तिचा शोध घ्या, असा सल्ला दिला जातो. त्यानंतर दुचाकी मालकाने शोध घेऊनदेखील मिळाली नाही तर, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होते; मात्र चोरीला गेलेली दुचाकी परत मिळणे कठीण झाले आहे. अनेक वेळा त्या दुचाकीचे सर्व पार्ट काढून ते विक्री केले जात असल्याचेदेखील समोर आलेले आहे.

Web Title: Bike theft session continues; Six bikes were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.