अंबाजोगाईत बर्ड फ्लू जागरूकता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:02+5:302021-01-24T04:16:02+5:30

केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सौरभ शर्मा यांनी अभियानाविषयी माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या गटचर्चा, किसान गोष्टी, तंत्रज्ञान ...

Bird flu awareness campaign in Ambajogai | अंबाजोगाईत बर्ड फ्लू जागरूकता अभियान

अंबाजोगाईत बर्ड फ्लू जागरूकता अभियान

Next

केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सौरभ शर्मा यांनी अभियानाविषयी माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या गटचर्चा, किसान गोष्टी, तंत्रज्ञान प्रात्यक्षिक, शेतकरी चर्चासत्र व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून बर्ड फ्लूविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी व आत्मा बीडचे तालुकास्तरीय व्यवस्थापक यांनी अभियानात सहभाग घेतला. अभियानादरम्यान गावांमध्ये व पशुचिकित्सालयात जागरूकता पोस्टर चिटकविण्यात आले. अभियानात बर्ड फ्लूबाबत जागरूकतेसोबतच शेतकऱ्यांच्या मनातील या विषयाची भीती व शंका-कुशंका दूर करण्याचे काम करण्यात आले.

ब्रॉयलर कुक्कुटपालक शेतकऱ्यांचे चर्चासत्र आयोजित करून पोल्ट्री शेडचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्जंतुकीकरण करण्याचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच समाज माध्यमातून बर्ड फ्लूविषयी जागरूकता निर्माण करणारे संदेश पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले.

शेतकरी गटचर्चा, किसान गोष्टी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. मुक्त पद्धतीने देशी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील काही काळ बंदिस्त पद्धतीने कुक्कुटपालन करून, कुक्कुटपालन परिसरात निर्जंतुकीकरण करण्याविषयी माहिती देण्यात आली. बर्ड फ्लूची भीती न बाळगता योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे व कुक्कुट तसेच इतर पक्ष्यांमध्ये मरतूक आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन केंद्रातील कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले.

बर्ड फ्लूविषयी माहिती देताना केंद्रातील पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कोरके यांनी सांगितले की, बर्ड फ्लू पक्ष्यांना होणारा संसर्गजन्य आजार आहे. इत्यादी बर्ड फ्लू विषाणूच्या ८ प्रजाती आहेत. हा विषाणू बदकासारख्या पाणपक्ष्यात आढळतो. बाधित पक्ष्यांच्या संपर्कात आल्यावर माणसांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. बर्ड फ्लूची लागण झाल्यास माणसांमध्ये सर्दी, घसा खवखवणे, खोकला, ताप, पोटात दुखणे व जुलाब ही लक्षणे दिसून येतात. बर्ड फ्लू विषाणू माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. चिकन व अंडी खाण्यापूर्वी पूर्णपणे शिजवून सेवन करावे, असे डॉ. कोरके यांनी सांगितले. तसेच १ लीटर पाण्यात ७ ग्रॅम या प्रमाणात धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) मिसळून द्रावणाने कोंबड्यांचे खुराडे फवारावे, असा सल्ला दिला.

Web Title: Bird flu awareness campaign in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.