वडवणीत भाजप नगरसेवकास विनयभंग प्रकरणी ३ वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:15 AM2020-01-15T00:15:29+5:302020-01-15T00:15:57+5:30
नगसेवक प्रेमदास राठोड याला वडवणी प्रथमवर्ग न्यायालयाने ३ वर्षाची कारावसाची शिक्षा व ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वडवणी : वडवणी नगर पंचायतमधील भाजपचे नगरसेवक प्रेमदास सीताराम राठोड याच्यावर २० नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्री शहरातील विवाहित पीडित महिलेच्या घरी प्रवेश करून विनयभंग केल्याचा वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा निकाल मंगळवारी लागला. यात नगसेवक प्रेमदास राठोड याला वडवणी प्रथमवर्ग न्यायालयाने ३ वर्षाची कारावसाची शिक्षा व ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वडवणी नगर पंचायतचा भाजपचा नगरसेवक प्रेमदास राठोड याने शहरातील एका विवाहित पीडित महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केल्याची घटना २०१८ साली घडली होती. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण वडवणी न्यायालयात सुरु होते.
यामध्ये फिर्यादीचे वडील, घटनास्थळ पंच, हे सरकारी पक्षास फितूर झाले होते व त्यानंतर फिर्यादीने देखील गुन्हा तडजोड करण्यासाठी प्रतिज्ञा लेख दाखल केला होता. परंतु न्यायालयाने याप्रकरणात कायदेशीररित्या सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या निर्णयाचा दाखला दिला व घटना सिध्द झाल्याने ३ वर्षे कारावासाची शिक्षा व ८ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
या गुन्ह्याचा तपास सपोनि सपोनि महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सी.के.माळी यांनी केला. सरकार पक्षातर्फे अॅड. एस.एच.जाधव यांनी काम पाहिले तर ए.एस.आय.सानप व पो.हे.काँ.गडदे यांनी तपासात सहकार्य केले. वडवणी न्यायालयाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निकाल असल्याची प्रतिक्रिया महिला वर्गातून दिल्या जात आहेत. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल.