माजलगाव राष्ट्रवादीला भाजपचा हाबाडा; दिग्गजांच्या पॅनलचा धुव्वा उडवत ग्रामपंचायती ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 14:12 IST2022-12-20T14:11:22+5:302022-12-20T14:12:14+5:30
मुंबई बाजार समिती सभापती अशोक डक यांच्या गावात गड आला पण सिंह गेला

माजलगाव राष्ट्रवादीला भाजपचा हाबाडा; दिग्गजांच्या पॅनलचा धुव्वा उडवत ग्रामपंचायती ताब्यात
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : माजलगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने चांगलाच हाबाडा दाखवत महत्त्वाच्या ग्रामपंचायतवर ताबा मिळवला.
माजलगाव तालुक्यात 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. राहिलेल्या 40 जागांची निवडणूक दोन दिवसांपूर्वी झाली होती. मंगळवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत 15 जागांचे निकाल जाहीर झाले होते. त्यापैकी 9 भाजप ,तीन अपक्ष तर तीन राष्ट्रवादीचे सरपंच पदाची उमेदवार विजयी झाले.
मुंबई बाजार समि तीचे सभापती अशोक डक यांच्या गटाचा सरपंच पदाच्या उमेदवार पराभूत झाला तर सर्व सदस्य त्यांच्या गटाची निवडून आले. त्याचबरोबर बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांच्या गावात देखील राष्ट्रवादीला झटका बसला.
बाजार समिती निवडणुकीनंतर भाजपचे रमेश आडसकरांनी चांगलीच मुसंडी मारत आ. प्रकाश सोळंके यांना चांगला हाबाडा दिल्याचे चित्र दिसून येत आहे.