आष्टी तालुक्यात भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:36+5:302021-01-19T04:35:36+5:30
कऱ्हेवाडी - भाजप, कऱ्हेवडगाव भाजप, धनगरवाडी भाजप, डोईठाण अमोल तरटे गट भाजप, हातोला भाजप, धनगरवाडी डो. ...
कऱ्हेवाडी - भाजप, कऱ्हेवडगाव भाजप, धनगरवाडी भाजप, डोईठाण अमोल तरटे गट भाजप, हातोला भाजप, धनगरवाडी डो. भाजप, पिंपळा आ. धस, माजी आ. दरेकर गट, वटणवाडी महेश ग्रामविकास गाव पॅनल, सुंबेवाडी - आ. धस, आ. आजबे, दरेकर गट, सोलापूरवाडी - आ. धस, दरेकर गट, खुंटेफळ पुंडी - आ. धस, माजी आ. धोंडे- माजी आ. दरेकर गट असा ११ ग्रामपंचायतींचा निकाल लागला. यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. या अगोदर शेरी बुद्रुक ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
विजयी सदस्य मला, मुंडे व धोंडेंना मानणारे
निवडणुकीत आष्टी मतदारसंघात ९०% ग्रामपंचायत सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. यामध्ये माझे लोक जास्त प्रमाणात असून, पंकजा मुंडे, माजी आ. भीमराव धोंडे यांना मानणारेही ग्रामपंचायत सदस्य यात असल्याने सरपंचपदाच्या निवडणुका झाल्यावरही मेळ लागेल. सध्यातरी भाजपने नव्वद टक्के जागांवर विजय मिळविला असल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले.
सर्व सदस्य भाजपचे
आष्टी मतदारसंघातील २१ ग्रामपंचायतींपैकी १८ ठिकाणी आम्ही आ. सुरेश धससोबत एकत्र लढलो आहे. हे सर्व सदस्य भाजपचे असून, हे यश भाजपला मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुफडा साफ केला असल्याचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले.