वीजबील माफीसाठी अंबाजोगाईत भाजपचे टाळेठोक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 03:41 PM2021-02-05T15:41:24+5:302021-02-05T15:42:36+5:30
वीजबील माफ करा, अशा घोषणा देt सक्तीने होत असलेल्या वसुलीचा यावेळी निषेध नोंदविला.
अंबाजोगाई - थकीत वीज बिलाची सक्तीने सुरू असलेली वसुली थांबवा, कोरोना काळातील वीज बील माफ करा. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर निदर्शने करत टाळेठोक आंदोलन करण्यात आले.
लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांची आर्थिक स्थिती खालवलेली असतांना महावितरणने वीजग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिले दिली. आता या वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. ही सक्तीची वसुली थांबवा व शासनाने हे संपूर्ण वीजबील माफ करावे. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वीजबील माफ करा, अशा घोषणा देण्यात आल्या. सक्तीने होत असलेल्या वसुलीचा यावेळी निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केले.
या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, नगरसेवक सारंग पुजारी, डॉ. अतुल देशपांडे, मधुकर काचगुंडे, शेख खलील मौलाना, सुरेश कºहाड, अनंत लोमटे, कमलाकर कोपले, दिलीप काळे, बालाजी पाथरकर, डॉ. निशिकांत पाचेगावकर, संजय गंभीरे, जीवन किर्दंत, प्रशांत आदनाक, अॅड. संतोष लोमटे, शैलेश कुलकर्णी, हिंदुलाल काकडे, महादू मस्के, नूर पटेल, पंडित जोगदंड, शिरीष मुकडे, शिवाजी डोईफोडे, बंडू चाटे, मुकुंद शेप, कपील देशमुख, अनंत आरसुडे, अमोल पवार, गोपाळ मस्के, योगेश कडबाने, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.