मराठा आरक्षणासाठी भाजपचे माजलगावात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:43+5:302021-06-30T04:21:43+5:30

माजलगाव : मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ २९ जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ...

BJP's agitation in Majalgaon for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी भाजपचे माजलगावात धरणे आंदोलन

मराठा आरक्षणासाठी भाजपचे माजलगावात धरणे आंदोलन

Next

माजलगाव : मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ २९ जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी संपूर्ण बहुजन समाज एकवटला होता.

सर्व समाजाला सोबत घेऊन आडसकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्येकर्ते आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरले.

मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, ठाकरे सरकारने याची दखल घ्यावी, असे भाजप नेते रमेश आडसकर यांनी धरणे आंदोलनादरम्यान सरकारला सुनावले. महाराष्ट्रात मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्यांना आरक्षणाची खरी गरज आहे, म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर यांनी सरकारच्या दुटप्पी धोरण यावर कठोर प्रहार केले.

यावेळी राजाभाऊ मुंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत, बबनराव सोळंके, ज्ञानेश्वर मेंडके, डॉ.भगवानराव सरवदे, डॉ.अशोक तिडके, बबनराव सिरसट, गोरक धुमाळ, शिवाजी मायकर, सुनील शिनगारे, ऋषिकेश आडसकर, हनुमान कदम, अनंत जगताप, मच्छिंद्र झाटे, डॉ.प्रशांत पाटील, सुरेश दळवे, पंजाबराव मस्के, दीपक मेंडके, राजेंद्र होके, रामचंद्र डोईजड, निळकंठ भोसले, अजय शिंदे, मनोज जगताप, विनायक रत्नपारखी, मनोज फरके, ईश्वर खुरपे, राम गायकवाड, राम सावंत, छबन घाडगे, भगीरथ शेजुळ, बाबासाहेब आगे आदींसह मराठा बांधव धरणे आंदोलनात सहभागी झाला होता.

===Photopath===

290621\purusttam karva_img-20210629-wa0031_14.jpg

Web Title: BJP's agitation in Majalgaon for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.