आडसकर, क्षीरसागर, धसांची ताकद भाजपाची जमेची बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:35 AM2019-04-15T00:35:37+5:302019-04-15T00:37:28+5:30

केज विधानसभा मतदारसंघाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह गेल्या तीनही निवडणुकीत भाजपाला आघाडी दिली आहे. २००९ मध्ये डॉ. विमल मुंदडा (राष्ट्रवादी), २०१२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी) तर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रा. संगीता ठोंबरे (भाजपा) निवडून येत राहिले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनाच आघाडी मिळाली होती.

BJP's Jamsa Jassa, Ashsakar, Kshirsagar, Dhasakta Shakti | आडसकर, क्षीरसागर, धसांची ताकद भाजपाची जमेची बाजू

आडसकर, क्षीरसागर, धसांची ताकद भाजपाची जमेची बाजू

Next
ठळक मुद्देलोकमत विशेष : राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा बसणार फटका?

अविनाश मुडेगावकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह गेल्या तीनही निवडणुकीत भाजपाला आघाडी दिली आहे. २००९ मध्ये डॉ. विमल मुंदडा (राष्ट्रवादी), २०१२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी) तर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रा. संगीता ठोंबरे (भाजपा) निवडून येत राहिले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनाच आघाडी मिळाली होती.
या मतदारसंघावर तसा कै. डॉ. विमल मुंदडा यांचा मोठा प्रभाव होता. मुंदडा यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत मुंदडांच्या कुटुंबात उमेदवार उपलब्ध नसल्याने पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आली. नंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत नमिता मुंदडा व संगीता ठोंबरे यांच्यात झालेल्या लढतीत संगीता ठोंबरे विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे केज मतदारसंघातील असल्याने त्यांना सहानुभूती मिळू लागली आहे. रजनीताई पाटील , राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख यांचे पाठबळ आघाडीच्या पाठीशी आहे. मुंदडा व सोनवणे यांच्यातील कलह दूर झाला आहे. भाजपाला तगडे आव्हान देणारी यंत्रणा केज विधानसभा मतदारसंघात तरी कार्यरत आहे.
याशिवाय आ. विनायक मेटे यांचे मूळ गाव केज विधानसभा मतदार संघात येत असल्याने याचाही राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो. तसेच जयदत्त क्षीरसागरांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक मते भाजपाच्या पारड्यात जाऊ शकतात.
केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई हे सर्वात मोठे शहर आहे. या अंबाजोगाई शहराने मात्र, लोकसभेची पोटनिवडणूक वगळता कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झुकते माप देऊन आघाडी दिलेली आहे.
युती प्लस पॉर्इंट काय आहेत ?
रमेश आडसकर हे भाजपासोबत असल्याने त्यांची मोठी ताकद प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. याशिवाय जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे.
युती वीक पॉर्इंट काय आहेत ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुलनेत भाजपाची प्रचारयंत्रणा तोकडी पडत आहे. तसेच आ. विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेले संधान याचा बराच फटका या मतदारसंघात होऊ शकतो.
.....
आघाडी प्लस पॉर्इंट काय आहेत ?
राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी अंबाजोगाई, केज या दोन्ही नगर परिषद काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मतदारसंघात प्रचार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
आघाडी वीक पॉर्इंट काय आहेत ?
आजतागायत या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही प्रचार सभा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या मतदारसंघात असली तरी राष्ट्रवादीला गटबाजीने पोखरलेले आहे.

Web Title: BJP's Jamsa Jassa, Ashsakar, Kshirsagar, Dhasakta Shakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.