माजलगावात भाजपचे मताधिक्य निम्म्याने घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:09 AM2019-05-26T00:09:38+5:302019-05-26T00:11:06+5:30

मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत माजलगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपा उमेदवाराची आघाडी ५० टक्क्याने घटली असून माजलगाव शहरात देखील भाजपाची चांगलीच पिछेहाट झाल्याचे निकालाने स्पष्ट केले आहे. माजलगाव तालुक्यापेक्षा वडवणी व धारूर तालुक्यात भाजपाला मोठे यश मिळाले.

The BJP's marginal decrease in Majlaga | माजलगावात भाजपचे मताधिक्य निम्म्याने घटले

माजलगावात भाजपचे मताधिक्य निम्म्याने घटले

Next
ठळक मुद्देमाजलगाव विधानसभा मतदार संघ । वडवणी, धारुर तालुक्यातून चांगली आघाडी

पुरुषोत्तम करवा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत माजलगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपा उमेदवाराची आघाडी ५० टक्क्याने घटली असून माजलगाव शहरात देखील भाजपाची चांगलीच पिछेहाट झाल्याचे निकालाने स्पष्ट केले आहे. माजलगाव तालुक्यापेक्षा वडवणी व धारूर तालुक्यात भाजपाला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवाराने भरपुर मतदान खेचल्यामुळे भाजप तरले. त्यामुळे विरोधी राष्ट्रवादी सोबतच भाजपालाही चिंतन करण्याची वेळ आली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत माजलगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना - भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना १ लाख १६६, राष्ट्रवादी कॉंग्रेस - काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ८३ हजार २८३ ,वंचित आघाडीचे प्रा.विष्णु जाधव यांना १९ हजार ८६ मते मिळाली. युतीच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना १६ हजार ८८३ मतांची आघाडी या मतदार संघात मिळाली. मागील लोकसभा निवडणुकीत याच मतदार संघातुन स्व.गोपीनाथ मुंडे यांना ३५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपाची आघाडी ५० टक्क्यांपेक्षा जास्तीने घटली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपकडून मातब्बर नेतेमंडळी प्रचारात उतरली होती. वंचित आघाडीचा उमेदवार या निवडणुकीत नसता तर वेगळेच चित्र पहावयास मिळाले असते. तालुक्यात मागील लोकसभेला भाजपला १८ हजार मताची आघाडी मिळाली होती. तर या निवडणुकीत केवळ ३ हजार ५०० मतांची आघाडी मिळु शकली.वडवणी तालुक्यातही मागील निवडणुकीच्या तुलनेत मतांच्या आघाडीत घट झाली. तर धारूर तालुक्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी चांगली आघाडी मिळू शकली. माजलगाव शहरात आतापर्यंत भाजपला आघाडीच मिळत असे. विशेष बाब म्हणजे येथील नगरपालिका ही भाजपच्याच ताब्यात आहे. तरीही मताधिक्य घटले.
अपक्षांना १५ हजार मते
माजलगाव मतदार संघात भाजप - राष्ट्रवादी मध्ये दुरंगी लढत झाली असली तरी वंचित आघाडीला चांगलेच मताधिक्य मिळु शकले तर इतर ३४ उमेदवांपैकी २ उमेदवार वगळता इतर उमेदवारांना चार आकडी संख्या देखील ओलांडता आली नाही.
तिघेही एकत्र !
दोन वर्षांपूर्वी माजलगाव नगर पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार १ हजार मतांनी निवडून आले होते.
या निवडणुकीत न.प. मध्ये पहिल्या तीन मध्ये असलेल्या उमेदवारांनी भाजपचा प्रचार केला.
मात्र, शहरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला १ हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले.
बड्या नेत्याची सभा नाही
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही.
अजित पवार यांची मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात सभा होती, परंतु तीही ऐनवेळी रद्द करण्यात आली.
भाजपाकडून देखील पालकमंत्री पंकजा मुंडे वगळता कोणाचीही सभा झाली नाही.

 

Web Title: The BJP's marginal decrease in Majlaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.