रस्ता कामासाठी डांबराऐवजी वापरले काळे ऑइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:02+5:302021-02-12T04:32:02+5:30
बीड : आष्टी तालुक्यातील धानोरा ते घोंगडेवाडी या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून डांबराऐवजी काळे ऑइल वापरले जात ...
बीड : आष्टी तालुक्यातील धानोरा ते घोंगडेवाडी या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून डांबराऐवजी काळे ऑइल वापरले जात असल्याची तक्रार करत ग्रमस्थांनी रस्ता काम बंद पाडले. याची सखोल चौकशी करावी व संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदार व अधिकारी यांनी मिळून रस्त्याच्या कामात बोगसगिरी केल्याचा आरोपदेखील ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी कामाची तपासणी गुणनियंत्रण विभागमार्फत करण्यात यावी व अंदाजपत्रकाप्रमाणे कामाचा दर्जा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी ग्रामविकास मंत्री व संबंधित विभागास तक्रारदेखील केली आहे. याप्रकरणी योग्य चौकशी होईपर्यंत रस्ता काम बंद ठेवण्याची इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.