काळ्या फिती लावून आंदोलन, अंबाजोगाईत नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे काळी फीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:24+5:302021-04-03T04:30:24+5:30
राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतींमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याच आंदोलनाचा एक ...
राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतींमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून १ एप्रिल २०२१ रोजी काळ्या फिती लावून काम करण्यात आले.
या आंदोलनाचा पुढील टप्पा हा १५ एप्रिल रोजी एक दिवस लेखणी बंद आंदोलन आणि १ मे कामगार दिनापासून अत्यावश्यक सेवेसह कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायती / संवर्ग कर्मचारी संघटनांनी राज्यातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन दोन-दोन महिने होत नाही. इतर न्याय्य मागण्यांसाठी तीन टप्प्यांत राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे शासनास निवेदन देऊन कळविले होते. सदरील आंदोलनाचा पहिला टप्पा १ एप्रिल रोजी काळी फीत लावून शासनाचा निषेध केला. त्यानुसार कर्मचारी संघटना शाखा, नगरपरिषद अंबाजोगाईने आंदोलनाबाबत मुख्याधिकारी यांना पूर्वसूचना देऊन १ एप्रिल २०२१ रोजी राज्य शासनाचा निषेध म्हणून नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कपिल कसबे, संघटनेचे उपाध्यक्ष माधुरी परळीकर, संघटनेचे सचिव शेख इफ्तेकार, कर्मचारी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व्ही. टी. लहाने, कार्यालयीन अधीक्षक ए. जे. चव्हाण, नगर रचनाकार अजय कस्तुरे, उदय दीक्षित, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, श्रीकांत थोरात, अनिल सोनी, धनंजय चव्हाण, संजय सातपुते, रमाकांत सोनकांबळे, वंदना कुलकर्णी, सुनील वसमतकर, दामू चव्हाण, नंदकिशोर कावारे, व्यंकट पाटील, खंडेराव वाघमारे, सुशील साठे व पाणी पुरवठा विभाग अरूण कुरे, भरत लखेरा तसेच सर्व विभागांचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत.
===Photopath===
020421\avinash mudegaonkar_img-20210402-wa0050_14.jpg