पांढऱ्या दुधावर पडली कोरोनाची काळी छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:52+5:302021-04-19T04:30:52+5:30

शिरूर कासार : शेतीला जोडधंदा देत प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत. ...

The black shadow of the corona fell on the white milk | पांढऱ्या दुधावर पडली कोरोनाची काळी छाया

पांढऱ्या दुधावर पडली कोरोनाची काळी छाया

Next

शिरूर कासार :

शेतीला जोडधंदा देत प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुधाला मिळणारा भाव आणि चारा, खुराक ,औषधी याचा खर्च जमा धरता जुळवाजुळव होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. पांढऱ्या दुधावरही कोरोनाची काळी छाया पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरुर कासार तालुक्यातील शेतकरी शहरात दररोज सकाळी दूध घ्या दूध, दूधवाला अशी आरोळी मारून घरोघरी रतीब लावून चहासाठी हॉटेल चालकाला दूध पुरवितात. वार्णी, कान्होबाचीवाडी, कोळवाडी, झापेवाडी, दहिवंडी, राक्षसभुवन, आनंदगाव, भालगावसह इतर गावातून दोनशेच्या आसपास शेतकरी दूध शहरात आणतात. या जोड धंद्यालाच आता मंदीचे दिवस आले. दुभत्या जनावरांच्या वाढत्या किमती, त्यांना चारा, खुराक देतांना करावी लागणारी कसरत याचा ताळमेळ लागत नाही. या जोडधंद्यात केवळ शेणाचाच वास शिल्लक राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शेती ही सतत निसर्गाच्या कोपाला बळी पडते. हाता तोंडासी आलेला घास देखील हिरावला जातो. हे अंगवळणी पडले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चांगला होता, मात्र आता परिस्थिती कठिण बनली आहे. दूध संकलन केंद्रावर डिग्री फॅटप्रमाणे २५ रुपये प्रती लीटर भाव मिळतो. त्यात आता आणखी चार रुपयांनी भाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे. यावर उपाय म्हणून घरगुती रतीब व हाॅटेलमधे दूध पाहून भाव मिळतो. यात शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे मिळतात. मात्र हे पैसे उधारीवर असतात. आता लॉकडाऊनमुळे हॉटल बंद झाले असून, कोरोनाच्या संकटामुळे बाहेरील व्यक्तीचे दूधही शहरातील नागरिक घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाळ जनावर घेण्यापासून सांभाळावे लागते. पर्यायाने भांडवली खर्च, गुंतवणुकीचा विचार केला असता, अधिक प्रमाणात नफा मिळत नाही. यातच हे संकट आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोट,

दोन वर्षांपासून मंदीचे सावट

गेल्या दोन वर्षांपासून दूध व्यवसायावर मंदीचे सावट आहे. मागील उन्हाळ्यात कोरोना आल्याने लस्सी, ताक, आइस्क्रिम आदी दुग्धजन्य पदार्थांचा खप न झाल्यामुळे दुधाचे भाव घसरले. आता कुठे जानेवारीपासून सुरुवात झाली होती. त्यात पुन्हा लाॅकडाऊनमुळे हा उन्हाळी हंगाम देखील जात आहे. दुग्ध व्यवसाय हा मोठा आर्थिक विषय असल्याने शासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे अन्यथा शेतकऱ्याचा कणाच मोडेल. पशुखाद्य विक्रेत्यावर नियंत्रण असावे अशी प्रतिक्रिया घोगस पारगावचे सरपंच तथा दूध संकलन करणारे देवा गर्कळ यांनी दिली.

Web Title: The black shadow of the corona fell on the white milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.