सातबारा कोरा करा, अन्यथा बीड जिल्ह्यात फिरू नाही देणार; खांड यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:40 PM2018-03-06T23:40:58+5:302018-03-06T23:41:05+5:30
शेतक-यांचा सातबारा कोरा करा अन्यथा भाजपच्या आमदारांना जिल्ह्यात शेतकरी फिरू देणार नाहीत, अशा सज्जड इशारा जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला. ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियानात मंगळवारी त्यांनी उमरद (खालसा), भाटसांगवी, राक्षसभुवन या गावांमधील शेतक-यांशी संवाद साधताना खांडे बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेतक-यांचा सातबारा कोरा करा अन्यथा भाजपच्या आमदारांना जिल्ह्यात शेतकरी फिरू देणार नाहीत, अशा सज्जड इशारा जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला. ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियानात मंगळवारी त्यांनी उमरद (खालसा), भाटसांगवी, राक्षसभुवन या गावांमधील शेतक-यांशी संवाद साधताना खांडे बोलत होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव इ. विषयांवर हे अभियान राबविले जात आहे. शासनाची ही कर्जमाफी फक्त घोषणेपुरती असून, भाजपाने शेतक-यांना फसवण्याचेच काम केले आहे.
अभियानाच्या दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात उमरद खालसा, राक्षसभुवन, भाटसांगवी व दुपारच्या सत्रात राजूरी (घो), शिदोड, नागापुर (खु.) या गावातील शेतक-यांच्या भेटी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षपदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतल्या. याप्रसंगी तालुकाप्रमुख उल्हास गिराम, रतन गुजर, बबन पवार, अशोक वाकडे उपस्थित होते. माळापुरी येथील कार्यक्रमास कांता ढास, मच्छिंद्र पडुळे, राजू बेग, समीर मिर्झा, अकबर बेग, उमरद खालसा येथे घोडे, कल्याण जाधव, कचरू जाधव, दशरथ जाधव, गणेश घोडे, दत्ता जोगदंड, राक्षसभुवन येथे झुंबर मस्के, बाबासाहेब गाडे, अशोक लोणकर, सुग्रीव मस्के, श्रीकृष्ण लोणकर, रमेश मस्के, विठ्ठल मस्के, भाटसांगवीत शामसुंदर बोरवडे, नितीन सोनवणे, अमोल सोनवणे, सागर छत्रभुज, राजूरी (घो) येथे आबा घोडके, भाऊसाहेब घोडके, हिरामण घोडके, अरूण घोडके, शिदोड येथे रणजीत कदम, विठ्ठल कदम, नागापूर खुर्द येथे राहुल साळुंके, अनंत साळुंके हे उपस्थित होते.