रस्त्याच्या मागणीसाठी मनसेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:06+5:302021-08-24T04:38:06+5:30

केज-बीड राष्ट्रीय महामार्गावरील बरड ते शिरूर घाट हा रस्ता सारूळ, सारणी, मुंडेवाडी, नारेवाडी, धोत्रा, शिरूर, हंगेवाडी, आगेवाडी ...

Block MNS road for road demand | रस्त्याच्या मागणीसाठी मनसेचा रास्ता रोको

रस्त्याच्या मागणीसाठी मनसेचा रास्ता रोको

Next

केज-बीड राष्ट्रीय महामार्गावरील बरड ते शिरूर घाट हा रस्ता सारूळ, सारणी, मुंडेवाडी, नारेवाडी, धोत्रा, शिरूर, हंगेवाडी, आगेवाडी आदींसह अनेक गावांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याची वाताहत झाली आहे. सदरचा रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बरड ते शिरूर घाट रस्ता झाला तर धोत्रा गावातील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. सदर रस्ता उस्मानाबाद जिल्ह्याला जोडणारा असल्याने तो व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण रस्ता असल्याने बरड ते शिरूर घाट या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २३) केज - बीड राष्ट्रीय महामार्गावरील अंबळाचा बरडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी दोन महिन्यात या रस्त्याचे काम चालू करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अतुल मुंडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या रास्ता रोको आंदोलनात मनसे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार, मनसे शेतकरी सेनेचे केज तालुका अध्यक्ष बाबूराव ढाकणे, मनसेचे तालुका सचिव गोरख तोगे, मनसेचे राज घोळवे, प्रभाकर ढाकणे, गोविंद ढाकणे, गोविंद हाके, श्रीकांत वाघमोडे, गोपाळ हाके, अंकुश ठोंबरे, बालाजी गिते, बापूराव गिते, महादेव मुंडे, प्रदीप मुंडे, अशोक तोगे, हनुमंत मुंडे, मनसेचे संतोष सिरसट आदींसह मनसेचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी केज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

230821\1647-img-20210823-wa0013.jpg~230821\img-20210823-wa0015.jpg

रस्त्याच्या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन करण्यात आले.~मनसेच्या वतीने रस्त्याच्या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

Web Title: Block MNS road for road demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.