धारूर घाट रुंदीकरणासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:22 AM2021-06-29T04:22:42+5:302021-06-29T04:22:42+5:30
धारूर : धारूर ते तेलगाव रस्त्यावर खामगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना धारूर घाटाचे रुंदीकरण न केल्याने या ...
धारूर : धारूर ते तेलगाव रस्त्यावर खामगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना धारूर घाटाचे रुंदीकरण न केल्याने या घाटात रोजच अपघात होत आहेत. याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने धारूर घाटात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात घाटातील सर्व वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. प्रशासनाने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मंचचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांच्यासह तालुकाध्यक्ष सनी गायसमुद्रे, शैलेंद्र गायसमुद्रे, वंचितचे शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे, ऑल इंडिया पॅंथरचे तालुकाध्यक्ष राकेश सिरसट, जिजा सिरसट, एमआयएमचे शहराध्यक्ष मोबीन शेख, सिद्दिक शेख, अजय गायसमुद्रे, गणेश सिरसट, गणेश कापसे, विशाल, अक्षय विकास ओव्हाळ अजय सिरसट व कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
280621\img-20210628-wa0102.jpg~280621\img-20210628-wa0101.jpg
===Caption===
धारूर घाट रुंदीकरण मागणी साठी रस्तारोको करताना ठप्प झालेली वाहतूक~धारूर घाट रुंदीकरण मागणी साठी रस्ता रोको करून निवेदन देताना