विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:04+5:302021-09-17T04:40:04+5:30
माजलगाव : शासनाने पीक विम्यासंदर्भात अनेक जाचक अटी शेतकऱ्यांवर लादून अन्याय केला आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित ...
माजलगाव : शासनाने पीक विम्यासंदर्भात अनेक जाचक अटी शेतकऱ्यांवर लादून अन्याय केला आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. विमा कंपन्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी सकाळी परभणी चौफळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर, सांगली भागातील मदतीएवढी मदत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, खरीप पिके अतिवृष्टीमुळे खराब झाली, त्यामुळे खरीप पिकांचे कर्ज माफ करून तत्काळ रब्बी हंगामातील पेरणीसाठी दुसरे पीक कर्ज देण्यात यावे, ई-पीक पेरा पद्धत रद्द करावी, विमा कंपनीला ७२ तासांत ऑनलाईन तक्रार देण्याची अट रद्द करून ऑफलाईन तक्रार दाखल करून घ्यावी, आठवडा बाजार व जनावरांचा बाजार तत्काळ सुरू करावा, आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे गजानन खामकर, कल्याण थेटे, श्रीकृष्ण कोके, परमेश्वर पिसुरे, आप्पा माऊली खेत्री, चत्रभुज नरसाळे, नितीन होके, भास्कर शिंदे, रामेश्वर गायकवाड, उद्धवराव मुळे, शिवप्रसाद खेत्री, भगवान रोकडे, बळीराम दराडे, लिंबाजी सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
160921\purusttam karva_img-20210916-wa0028_14.jpg