सोशल मीडियाच्या माध्यमातून १०८ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:29+5:302021-05-03T04:27:29+5:30
कोरोना महामारीमध्ये ऑक्सिजन व रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शासनानेदेखील रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. यात ...
कोरोना महामारीमध्ये ऑक्सिजन व रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शासनानेदेखील रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. यात योगदान म्हणून सामाजिक जाणिवेतून या रक्तदान शिबिरासाठी शिवजन्मोत्सव पालखी सोहळा समिती आणि सोशल मीडियाच्या पेजवरून सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ८० जणांनी नोंदणी केली होती. मात्र, शुक्रवारी वैष्णवी मंगल कार्यालयात झालेल्या शिबिरात प्रत्यक्षात १०८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक सलोखा राखण्याचे काम केले. यामध्ये महिलांची उपस्थित लक्षणीय होती. या मोहिमेसाठी बाल कलाकार हर्षद नायबळ, ए.व्ही. प्रॉडक्शनचे विश्वजित पोटभरे, सिनेअभिनेते संदीप पाठक यांनी सोशल मीडियाद्वारे आवाहन करून सहकार्य केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझरची बाटली, मास्कचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन अंडील, केदार सावंत, राज ढालमारे, दीपक तोडकरी, आदित्य धारक, चंद्रकांत गवळी, गणेश औटे, महेश बोटवे, नारायण आंबेगावकर यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
020521\purusttam karva_img-20210502-wa0029_14.jpg