नारायणगड संस्थानच्या शिबिरात ११३ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:31+5:302021-05-29T04:25:31+5:30
बीड : येथील सिंहगड लॉन्स येथे श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ११३ दात्यांनी ...
बीड : येथील सिंहगड लॉन्स येथे श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ११३ दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे हभप महंत गुरुवर्य शिवाजी महाराज, श्री क्षेत्र बंकटस्वामी संस्थानचे हभप लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड संस्थानचे महंत हभप जनार्दन महाराज स्वामी, श्री क्षेत्र रामगड संस्थानचे महंत हभप स्वामी योगीराज महाराज, श्री क्षेत्र जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान मादळमोहीचे हभप संभाजी महाराज, संत श्री तुकाराम महाराज संस्थान बेलखंडी हभप भक्तिदास महाराज आदींचे शुभाशीर्वाद या शिबिरास लाभले.
सध्या सर्वत्र कोरोना आजाराने थैमान मांडलेले आहे. संपूर्ण समाज या संकटात होरपळून निघत आहे. अशा संकटसमयी सामाजिक दायित्वाच्या कर्तव्य भावनेने हे शिबिर संस्थानच्या वतीने आयोजित केले होते.
श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे विश्वस्त दिलीप गोरे, ॲड. महादेव तुपे, अशोक हिंगे, भास्करराव जाधव, सीए. बी. बी. जाधव, बळीराम गवते, नितीन धांडे, अशोक येडे, ॲड. महेश धांडे, ज्ञानदेव काशिद, विठ्ठल बहीर, धनंजय गुंदेकर, गणेश घोलप, ॲड. योगेश शेळके, रमेश घोलप, मुकुंद गोरे, आर. आर. उगले, दिनेश काशिद, विशाल तांदळे, कल्याण कुलकर्णी, सुनील ठोसर,आप्पा इंदूरे, संतोष गुजर,महेश मुंडे, हरी कोठुळे,अनिल खोले आदींसह मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी, भाविकभक्त, रक्तदाते उपस्थित होते.
===Photopath===
280521\28_2_bed_5_28052021_14.jpeg~280521\28_2_bed_6_28052021_14.jpeg
===Caption===
नारायणगड संस्थानच्या शिबिरात ११३ दात्यांचे रक्तदान~नारायणगड संस्थानच्या शिबिरात ११३ दात्यांचे रक्तदान