जिव्हाळा ग्रुपच्या शिबिरात ११७ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:05+5:302021-01-13T05:29:05+5:30

डाके हॉस्पिटल येथे झालेल्या शिबिरात तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांसह अनेक महिलांनी रक्तदान केले. उद‌्घाटन तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते ...

Blood donation of 117 people in Jiwala group camp | जिव्हाळा ग्रुपच्या शिबिरात ११७ जणांचे रक्तदान

जिव्हाळा ग्रुपच्या शिबिरात ११७ जणांचे रक्तदान

Next

डाके हॉस्पिटल येथे झालेल्या शिबिरात तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांसह अनेक महिलांनी रक्तदान केले. उद‌्घाटन तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते झाले. गटविकास अधिकारी प्रज्ञा माने भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्ष हाेत्या. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुहास मिसाळ, महावितरणचे सहायक अभियंता चेतन चौधरी, जिव्हाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अजय डाके उपस्थित होते.

कोविडच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. ही निकड लक्षात घेत जिव्हाळा प्रतिष्ठानने या शिबिराचे आयोजन केले होते.

(फोटो कॅप्शन : माजलगाव येथील जिव्हाळा प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी येथील तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने भोसले व महिलांनी रक्तदान केले.)

Web Title: Blood donation of 117 people in Jiwala group camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.