बीड ग्रामीण ठाण्यात ७० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:07+5:302021-01-03T04:34:07+5:30
बीड : बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस उन्नती दिनानिमित्त बीड ग्रामीण ठाण्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात पोलीस ...
बीड : बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस उन्नती दिनानिमित्त बीड ग्रामीण ठाण्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ७० लोकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
सध्या जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हाच धागा पकडून व पोलीस उन्नती दिनाचे औचित्य साधून बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी साबळे यांच्यासह शिवाजीनगर ठाण्याचे पोनि. साईनाथ ठोंबरे, सपोनि. योगेश साबळे, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत, मुकेश गुंजाळ, भाऊ वाघमारे, डॉ. जयश्री बांगर, दुबाले यांच्यासह ग्रामीण ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. दिवसभरात ७० जणांनी रक्तदान केले. यात ४ पोलीस अधिकारी, १३ कर्मचारी आणि इतर सामान्य नागरिक, तरुणांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.