दारू पिण्यास पैसे न दिल्याने खून, मारेकऱ्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:20 AM2019-02-27T00:20:24+5:302019-02-27T00:22:02+5:30

दारू पिण्यास उसने पैसे दिले नाही म्हणून वृद्धाचा खून करणाऱ्या आरोपीला येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या. ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २५ फेब्रुवारी रोजी हा निकाल देण्यात आला.

Blood donation to alcohol, blood donation to the killer | दारू पिण्यास पैसे न दिल्याने खून, मारेकऱ्याला जन्मठेप

दारू पिण्यास पैसे न दिल्याने खून, मारेकऱ्याला जन्मठेप

Next
ठळक मुद्देबीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : आष्टी तालुक्यातील घटना

बीड : दारू पिण्यास उसने पैसे दिले नाही म्हणून वृद्धाचा खून करणाऱ्या आरोपीला येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या. ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २५ फेब्रुवारी रोजी हा निकाल देण्यात आला.
आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी ते गंगेवाडी रोडवर बांधकाम चालू असलेल्या हॉटेलमध्ये रावसाहेब नागू डुकरे (रा. बीड सांगवी , ता. आष्टी) हे अशोक ढवण (रा. गणगेवाडी ता. आष्टी) यांच्यासह झोपले असताना पूर्वी दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून विष्णू जगन्नाथ गुंड (रा. गणगेवाडी) याने रावसाहेब यास मारहाण करून खून केला व अशोक ढवण यास जबर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. ९ आॅक्टोबर २०१६ रोजी पहाटे तीन ते पाच च्या सुमारास ही घटना घडली होती.
घटनेच्या दोन दिवसापूर्वी विष्णू गुंड याने रावसाहेब डुकरे याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. ते न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली होती. यावेळी रावसाहेब याचा मुलगा व इतर लोकांनी या भांडणाची सोडवासोडव केली होती. त्यानंतर ८ आॅक्टोबर रोजी विष्णू गुंड याने रावसाहेब डुकरे यांना दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पुन्हा मारहाण केली होती. त्यानंतर ८ व ९ नऊ आॅक्टोबरच्या रात्री रावसाहेब डुकरे हे त्यांचे बांधकाम चालू असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी अशोक ढवण सोबत झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास विष्णू गुंड याने रावसाहेब डुकरे यांना काठीने व बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याच वेळी अशोक ढवण यास डोळ्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी रावसाहेब डुकरे यास उपचारासाठी नेताना त्याने त्याचा मुलगा व साक्षीदारांना विष्णू गुंड याने मारहाण केल्याचे सांगितले होते. उपचारासाठी दाखल करत असतानाच रावसाहेब याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी रावसाहेबचा मुलगा विजय याच्या फिर्यादीवरून विष्णू गुंडविरु द्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आष्टी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सखोल तपास करून या प्रकरणात आरोपीविरु द्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी दुसरे जिल्हा सत्र न्यायालयात झाली.
या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी काम पाहिले तर या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हेडकॉन्स्टेबल एस. आर. डोंगरे यांनी मदत केली.

नऊ साक्षीदार, पुरावा युक्तिवाद ग्राह्य
आरोपीविरु द्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर परिस्थितीजन्य पुराव्यावरून जिल्हा सरकारी वकील अजय राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दुसरे जिल्हा व सत्र न्या. ए. एस. गांधी यांनी खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून विष्णू गुंड यास जन्मठेप व पाच हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भांदविचे कलम ३२६ नुसार दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Blood donation to alcohol, blood donation to the killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.