अंबाजोगाईत रक्तदान, कोविड योद्धांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:37 AM2021-02-20T05:37:09+5:302021-02-20T05:37:09+5:30

अंबाजोगाई : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सार्वजनिक जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सुनील लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली ...

Blood donation in Ambajogai, honor of Kovid warriors | अंबाजोगाईत रक्तदान, कोविड योद्धांचा सन्मान

अंबाजोगाईत रक्तदान, कोविड योद्धांचा सन्मान

Next

अंबाजोगाई : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सार्वजनिक जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सुनील लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. मध्यरात्रीपासूनच शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे नियोजित कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात येऊन राजस्थानी मंगल कार्यालयात ठेवण्यात आले. यानिमित्त रक्तदान शिबिर आणि कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी चौकात मान्यवरांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आले नंतर सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. सार्वजनिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सदस्य संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, दीनदयाळ बँकेच्या अध्यक्षा शरयू हेबालकर, माजी उपनगराध्यक्ष सविता लोमटे, नगरसेवक सुरेश कऱ्हाड, अनंत लोमटे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीधारीलाल भराडिया, दिलीप काळे, मनसेचे सुनील जगताप, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन वाघमारे आदी उपस्थित होते. आपण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियम या अटींना बाधित राहूनच यावर्षीचा जयंती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सार्वजनिक जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सुनील लोमटे यांनी सांगितले. यावेळी कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘रोटरी’चे प्रांतपाल संतोष मोहिते, कल्याण काळे, गणेश राऊत, दत्ता शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला तसेच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुनील लोमटे यांना दुष्यांत लोमटे, रवी देशमुख, अमर देशमुख, संजय साळवे, दिग्विजय लोमटे, शाहीर मामा काळे आदींनी साथ दिली.

===Photopath===

190221\avinash mudegaonkar_img-20210219-wa0083_14.jpg

Web Title: Blood donation in Ambajogai, honor of Kovid warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.