आज केजमध्ये, तर उद्या बीडमध्ये रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:28+5:302021-07-14T04:38:28+5:30

केज : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वातंत्र्य संग्रामसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने १४ जुलै रोजी ...

Blood donation camp in Cage today and in Beed tomorrow | आज केजमध्ये, तर उद्या बीडमध्ये रक्तदान शिबिर

आज केजमध्ये, तर उद्या बीडमध्ये रक्तदान शिबिर

Next

केज : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वातंत्र्य संग्रामसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने १४ जुलै रोजी केज शहरातील वकीलवाडी, हनुमान मंदिरात ‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

केज शहरात लोकमत व रोटरी क्लब ऑफ केज, शिवसेना, शिवसेना महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जास्तीत दात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवून एक सामाजिक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या शिबिरात रक्तदान करण्यासाठी दीपक नाईकवाडे ९१३०१७७६६६, प्रा. हनुमंत भोसले ९४२३७३३८८८, पशुपतिनाथ दांगट ७७४४०१७९९९, रत्नाकर शिंदे ९४२१९१९१२२, रत्नमाला मुंडे ७०२०४६२७१४, सुमंत धस ९७६६०६१४०८, भाई मोहन गुंड ९४२३९७९४९२, सतीश राऊत ९४२३६१४०००, प्रवीण देशपांडे ९४२००३१५५५, राहुल खोडसे ९९२३८०२९६५, संदीप नाईकवाडे ९०७५९३४३४३, सतीश डांगे ८४५९५९५२११, कपिल मस्के ९४२२२४४०६७, बाबा मस्के ९७०२८८६४३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहभाग; उद्या बीडमध्ये शिबीर

लोकमतच्या या उपक्रमात श्रीश्रीश्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगनेदेखील सहभाग घेतला आहे. बीड येथील श्रीश्रीश्री रविशंकर विद्यामंदिर, पिंपरगव्हाण रोड, भक्ती कन्स्ट्रक्शनच्या मागे, जुनी मतिमंद विद्यालयाची इमारतीत हे रक्तदान शिबिर सकाळी साडेदहा ते पाच यावेळेत आयोजित केले आहे. शिष्य, अनुयायी आणि नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक दिलीप कुलकर्णी यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp in Cage today and in Beed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.