‘लोकमत' व आर्ट ऑफ लिव्हिंगचे १८ जुलै रोजी अंबाजोगाईत महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:23+5:302021-07-16T04:24:23+5:30
राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक बांधीलकीतून 'लोकमत'च्या वतीने स्वातंत्र्य सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या ...
राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक बांधीलकीतून 'लोकमत'च्या वतीने स्वातंत्र्य सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ''लोकमत रक्ताचं नातं'' या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत अंबाजोगाई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात लोकमत व आर्ट ऑफ लिव्हिंग अंबाजोगाई, भारतीय जैन संघटना, कल्पवृक्ष अकॅडमी, आधार माणुसकीचा, मार्ड, श्रमकरी ग्रुप देवळा यांचा सहभाग राहणार आहे.
रक्तदानासाठी संपर्क -:
संजय कुलकर्णी - ९७६७५७७७५६, धनराज सोळंकी - ९४२२२४२३२६, नीलेश मुथा - ९४२२२४२०८३, कल्याण नेहरकर - ९४२१४७९६४७,
ॲड. संतोष पवार - ९५६११९११०६, रवींद्र देवरवाडे - ९८२३८०८८६७, डॉ. केदार कुटे - ८०५५८१०११०, अविनाश मुडेगावकर - ९९२२४०२४६३.
रक्तदान कोण करू शकते?
१८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती.
रक्तदात्याचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असावे.
यापूर्वी रक्तदान करून तीन महिने झालेले असावे. कोरोनामुक्त होऊन एक महिना झालेला असावा.
कोरोना प्रतिबंधक लस घेऊन १४ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला असावा.
या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन संयोजक अविनाश मुडेगावकर यांनी केले आहे.