जिल्हा बँकेवर अखेर प्रशासक मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:34 AM2021-04-08T04:34:13+5:302021-04-08T04:34:13+5:30
------- सहा महिन्यांचा कालावधी प्राधिकृत समितीने पद धारण केल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी धनराज राजाभाऊ मुंडे व इतरांनी उच्च न्यायालयाच्या ...
-------
सहा महिन्यांचा कालावधी
प्राधिकृत समितीने पद धारण केल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी धनराज राजाभाऊ मुंडे व इतरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून सहा महिन्याच्या आत दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेऊन नवीन संचालक मंडळाकडे कार्यभार सुपूर्द करावयाचा आहे, असे विभागीय सहनिबंधकांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.
-------
विजय ठरला औटघटकेचा
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदारसंघातून सर्वच उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यापासून जिल्हा बँकेवर प्रशासक मंडळ येणार असे लोकमतने स्पष्ट केले होते, तर निवडून येणाऱ्या सदस्यांची गणपूर्ती पूर्ण होणार नसल्याने ‘गुलाल लागला; पण पुढे काय?’ निवडून आलेले उमेदवार औटघटकेचे ठरणार असे निवडणूक निकालाच्या वृत्तात स्पष्ट केले होते.
---------