परळीत जीपमध्ये तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळ्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 15:31 IST2019-12-10T15:25:04+5:302019-12-10T15:31:21+5:30
उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह परळी उपजिल्हारुग्णालयात आणण्यात आला आहे

परळीत जीपमध्ये तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळ्याने खळबळ
परळी : तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर एका जीपमध्ये रक्ताने माखलेला तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि.१० ) सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय सखाराम यमगर (30, रा.दगडवाडी ता.परळी) असे मृताचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभवन व ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरु आहे. विजय हेच जीपचे मालक असून ते त्यांचा गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय होता.
(सविस्तर वृत्त लवकरच )