राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बोंबाबोंब आंदोलन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:48+5:302021-07-23T04:20:48+5:30
अंबाजोगाई : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने सोमवारी अंबाजोगाईतील उपविभागीय अधिकारी, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी व तहसील कार्यालयासमोर ‘प्रतिनिधित्व आरक्षण ...
अंबाजोगाई : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने सोमवारी अंबाजोगाईतील उपविभागीय अधिकारी, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी व तहसील कार्यालयासमोर ‘प्रतिनिधित्व आरक्षण बचाओ - लोकतंत्र बचाओ’ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या ‘बोंबाबोंब आंदोलनात’राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि सर्व सहयोगी राजकीय, सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
शेतकरी विरोधी, कामगार कायदे, विद्यार्थी विरोधी धोरण, शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण, कंत्राटी पद्धत, शिक्षणसेवक पद्धत, सीएचबी पद्धत यांच्या विरोधात आणि अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविणे, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या समर्थनार्थ, रोस्टरची अंमलबजावणी करणे इत्यादी सर्व १४ मुद्यांवर शासनाच्या बहुजन विरोधी धोरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पदोन्नतीमधील आरक्षणाविषयी शासनाने १८ फेब्रुवारी, २० एप्रिल व ७ में २०२९ रोजी काढलेला शासन निर्णय हा बहुजन विरोधी संविधानविरोधी तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवमानना करणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आले. अंबाजोगाईतील आंदोलनात आर.डी.वैरागे, सी.वी.सरवदे, गोविंद सोन्नर, महादेव आगळे, रिझवान शेख, नासेर शेख, संजीव उमाप, प्रा.डॉ. मोहन मिसाळ, ॲड. दिलीप गोरे, व्यंकटेश गडदे, ज्योती मिसाळ, सुरेखा उमाप, केशर गडदे, सिंधुताई वाघमारे, शीतल वाघमारे, मंगल उपाडे यांच्यासह विविध कार्यालयातील कर्मचारी, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे पदाधिकारी, बुद्धिजीवी, बहुजन समाजासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटना, विद्यार्थी, महिला, शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
200721\4008avinash mudegaonkar_img-20210720-wa0092_14.jpg