कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पध्दती वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:49+5:302021-06-09T04:41:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : आंतरपीक पद्धतीचा आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार अवलंब करावा, लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाणांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : आंतरपीक पद्धतीचा आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार अवलंब करावा, लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाणांचे योग्य प्रमाण वापरावे तरच कोरडवाहू शेतीसाठी ते फायदेशीर ठरते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक विद्यापीठातील डॉ. भगवान आसेवार यांनी केले.
खामगाव कृषी विज्ञान केंद्र व किसान ॲपच्या माध्यमातून ५ जून रोजी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. यावेळी डॉ. आसेवार यांनी कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती वरदान यावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डॉ. हनुमान गरूड यांनी केले. आभार दीपक इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किसान फोरमचे प्राची देवळे, दीपक इंगळे यांनी परिश्रम घेतले.