दोघांचा मृत्यू, १८१ रुग्ण तर ११० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:36+5:302021-07-17T04:26:36+5:30

जिल्ह्यातील ४ हजार १८७ संशयितांची गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यात १८१ पॉझिटिव्ह ...

Both died, 181 patients and 110 corona free | दोघांचा मृत्यू, १८१ रुग्ण तर ११० कोरोनामुक्त

दोघांचा मृत्यू, १८१ रुग्ण तर ११० कोरोनामुक्त

Next

जिल्ह्यातील ४ हजार १८७ संशयितांची गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यात १८१ पॉझिटिव्ह तर ४ हजार ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४, आष्टी ४९, बीड २४, धारुर ६, गेवराई १७, केज १०, माजलगाव १०, परळी २, पाटोदा ३२, शिरुर १७ व वडवणी तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. तसेच २४ तासात दोन व जुने दोन अशा चार मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली. यात जहांगीरमोहा (ता. धारुर) येथील ५० वर्षीय पुरुष व बीडसांगवी (ता. आष्टी) येथील ६६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ९४ हजार ४५७ इतकी झाली आहे. पैकी ९० हजार ५९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ५७० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Both died, 181 patients and 110 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.