बीडमध्ये तिन्ही गावांच्या खस्ताहाल रस्त्यांना विद्यमान दोन्ही आमदारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:27 AM2017-12-29T00:27:11+5:302017-12-29T00:28:11+5:30

विकासाचा डांगोरा पिटणा-या बीड विधानसभेच्या विद्यमान आमदारांना मानखुरवाडी, आंबेसावळी, मन्यारवाडीचे खस्ताहाल रस्ते आतापर्यंत का नाही दिसले असा थेट सवाल शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी या गावाला भेटी देताना घेतलेल्या बैठकांमधून केला आहे.

Both MLA and MLAs are responsible for the bad roads of three villages in Beed | बीडमध्ये तिन्ही गावांच्या खस्ताहाल रस्त्यांना विद्यमान दोन्ही आमदारच जबाबदार

बीडमध्ये तिन्ही गावांच्या खस्ताहाल रस्त्यांना विद्यमान दोन्ही आमदारच जबाबदार

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेसावळी - मानखुरवाडी - मन्यारवाडी गावांना दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विकासाचा डांगोरा पिटणा-या बीड विधानसभेच्या विद्यमान आमदारांना मानखुरवाडी, आंबेसावळी, मन्यारवाडीचे खस्ताहाल रस्ते आतापर्यंत का नाही दिसले असा थेट सवाल शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी या गावाला भेटी देताना घेतलेल्या बैठकांमधून केला आहे.


कुंडलिक खांडे यांनी आपल्या संपर्क दौ-यात गुरुवारी सकाळी तालुक्यातील आंबेसावळी, मन्यारवाडी, मानखुरवाडी या गावांना भेटी दिल्या. यावेळी खांडे यांनी या सर्व समस्यांना विद्यमान दोन्ही आमदार जबाबदार असल्याचा आरोप केला. यावेळी भवानवाडीचे सरपंच हनुमान जगताप, बाभळखुंट्यांचे सरपंच बोरगे, आबासाहेब आगलावे, बाबू करांडे हे उपस्थित होते.

आंबेसावळी येथील जेष्ठ शिवसैनिक सुंदरराव गुंदेकर, चंद्रभान गुंदेकर, अर्जुन गुंदेकर, सुभाष बांडे, बालाजी पाटील गुंदेकर, परशुराम बांडे, गणेश बांडे, हनुमंत बांडे, अविनाश गुंदेकर, ईश्वर गुंदेकर यांसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हनुमंत गुंदेकर, मछिंद्र बांडे यांनी परिश्रम घेतले. मण्यारवाडी येथे पप्पू शिंदे, किशोर शिंदे, अनिल लोळगे, शेखनुर शेख अब्दुल, शिवाजी मुंडे, नवनाथ काचमंडे, भीमराव निसर्गन्ध उपस्थित होते. मण्यारवाडी बैठकीसाठी साहेबराव पोपळे यांनी परिश्रम घेतले. मानखुरवाडी कार्यक्रमासाठी राम कानडे, आबासाहेब ढवळे, भास्कर ढवळे, काम्बीलकर, अनिल जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नामदेव ढवळे, बाळू ढवळे यांनी परिश्रम घेतले.

तिन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधताना अद्यापही चांगले रस्ते नसल्याचे गावकºयांनी सांगितले. मानखुरवाडीला स्वातंत्र्यापासून अद्यापही रस्ता नाही तर आंबेसावळी - मण्यारवाडी या गावांचा रस्ता २० वर्षांपूर्वीचा आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हे अद्यापही कळले नसल्याची भडक प्रतिक्रिया गावकºयांनी कुंडलिक खांडे यांच्याकडे व्यक्त केली.

Web Title: Both MLA and MLAs are responsible for the bad roads of three villages in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.