पतसंस्थेत चोरी करताना दोघांना रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:35 AM2021-08-23T04:35:51+5:302021-08-23T04:35:51+5:30
बीड : गेवराई तालुक्यातील गढी येथील शिवहर शिक्षक पतसंस्थेत चोरी करताना दोघांना सुरक्षारक्षकाने रंगेहात पकडले. २० ऑगस्ट रोजी सुरक्षारक्षकाने ...
बीड : गेवराई तालुक्यातील गढी येथील शिवहर शिक्षक पतसंस्थेत चोरी करताना दोघांना सुरक्षारक्षकाने रंगेहात पकडले. २० ऑगस्ट रोजी सुरक्षारक्षकाने त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
गढी येथे शिवहर शिक्षक पतसंस्थेचे कार्यालय आहे. तेथे आत्माराम बप्पासाहेब गोरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. २० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता पतसंस्थेच्या छताचा पत्रा उचकटून दोन चोर आत शिरले. त्यांनी २५ हजार किमतीचा एलसीडी टीव्ही व ३० हजार किमतीचे फ्रिज असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब सुरक्षारक्षक गोरे यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी मोठ्या धाडसाने दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गोर यांच्या तक्रारीवरून प्रदीप अशोक खरात (२०) व लखन ऊर्फ बाळ्या छगन माळी (२२, दोघे रा. ठाकर आडगाव, ता. गेवराई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अंमलदार गणेश नांगरे तपास करीत आहेत.
...
तीन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, दोन्ही आरोपी पहिल्यांदाच चोरीच्या गुन्ह्यात पकडले गेले आहेत. त्यांना २१ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती सहायक उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांनी दिली.
....