जन्मदात्यावर गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न मुलाला दोन दिवस पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:15+5:302021-05-22T04:31:15+5:30
आष्टी शहरातील विनायकनगर भागात राहणारे संतोष किसन लटपटे हे आपल्या पत्नीसोबत सतत घरगुती काही ना काही कारणाने सतत भांडण ...
आष्टी शहरातील विनायकनगर भागात राहणारे
संतोष किसन लटपटे हे आपल्या पत्नीसोबत सतत घरगुती काही ना काही कारणाने सतत भांडण होत असत. अशाच प्रकारे गुरूवारी सायंकाळी असेच भांडण होऊन मुलगा किरण संतोष लटपटे याने राग अनावर झाल्याने घरगुती वादातून आपल्या बापावर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांना जबर जखम झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यानां औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मध्यरात्री हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी,पो ह बन्सी जायभाय हे करीत आहेत.