जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:21 PM2018-01-29T18:21:32+5:302018-01-29T18:22:26+5:30

शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठी, हा सवाल करत या सप्ताहावर आम्ही बहिष्कार घालत असल्याची माहिती पालिकेतील १२ नगरसेवकांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली.  

The boycott of 12 corporators of Majlgaon municipal corporation after taking objection to the advertisement | जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार

जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार

googlenewsNext

माजलगाव (बीड ) : शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठी, हा सवाल करत या सप्ताहावर आम्ही बहिष्कार घालत असल्याची माहिती पालिकेतील १२ नगरसेवकांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली.  

केंद्रशासनाच्या निर्देशानुसार शहरात सध्या स्वच्छता सप्ताह सुरु आहे. मात्र हा सप्ताह आयोजित करतांना कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात घेतले नाही, केवळ पत्रिका हातात टेकवुन कार्यक्रम घेत असल्याची माहिती देण्यात आली असा आरोप पालिकेतील १२ नगरसेवकांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत केला. मुख्य रस्ता सोडला तर वार्डावार्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याकडे अध्यक्षांना लक्ष देण्यास वेळ नाही, पालिकेची कचरा उचलण्याची स्वतःच्या मालकीची वाहने आहे ते सोडून खाजगी वाहनांवर वारेमाप खर्च चालविला आहे, दलितवस्तीचा निधी पडून जाणीवपूर्वक खर्च केला जात नाही, याबाबत तक्रार केली असता प्रशानाकडून चुकीची माहिती देण्यात येते, अध्यक्ष मनमानी स्वरुपात काम करत आहेत असा आरोपही यावेळी नगसेवकांनी केला. 

यासोबतच स्वच्छता सप्ताहावर होत असलेल्या खर्चाचा हिशोब अध्यक्षांना आम्ही विचारणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे गटनेते विजय आलझेंडे, शेख मंजुर, विजय शिंदे, सुदामती पौळ, रोहन घाडगे, राज सययद अहेमद, भागवतराव भोसले, राहुल लंगडे, नारायणराव होके, शिवसेनेचे नितीन मुंदडा, अशोक आळणे आदी नगरसेवक उपस्थित होते. पत्रकार परिषदेत सत्ताधारी नगरसेवक विनायक रत्नपारखी उपस्थित होते. या सर्वप्रकारावर त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. 

प्रोजेक्ट डायरेक्टरवर आक्षेप 
स्वच्छता सप्ताहाचे काम हे एका स्विकृत सदस्यावर सोपविण्यात आले आहे. ते कोणत्या अधिकाराने प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणुन काम पाहत आहेत, त्यांच्या नियुक्तीवर आमचा तीव्र असल्याचे नगरसेवकांनी यावेळी सांगीतले. 

नगरसेवकांनी केला पालिकेसमोर घंटानाद 
पत्रकार परिषद संपल्यानंतर या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिका कार्यालयासमोर स्वच्छता सप्ताहाविरोधात घंटानाद आंदोलन केले. 

माझे काम चांगले 
प्रोजेक्ट डायरेक्टर नेमण्याचा मला अध्यक्ष या नात्याने अधिकार आहे. काही नगरसेवकांकडून केवळ विरोधाला म्हणून विरोध सुरु आहे. सर्वसामान्यांना याबाबत काहीही तक्रार नाही. कितीही अडथळे आले तरी मी काम करत राहणार. आम्ही सर्व कामे चांगल्यारीतीने करत आहोत.
- सहाल चाउस, अध्यक्ष, नगर परिषद माजलगांव

Web Title: The boycott of 12 corporators of Majlgaon municipal corporation after taking objection to the advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड