कन्टेनमेंट झोनबाबत पंचायत समितीमध्ये विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:00+5:302021-04-28T04:36:00+5:30

माजलगाव : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पंचायत समितीने कन्टेनमेंट झोनचे पाठविलेले चुकीचे ३९ प्रस्ताव तहसीलदारांनी रद्द केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ...

Brainstorming in Panchayat Samiti regarding containment zone | कन्टेनमेंट झोनबाबत पंचायत समितीमध्ये विचारमंथन

कन्टेनमेंट झोनबाबत पंचायत समितीमध्ये विचारमंथन

googlenewsNext

माजलगाव : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पंचायत समितीने कन्टेनमेंट झोनचे पाठविलेले चुकीचे ३९ प्रस्ताव तहसीलदारांनी रद्द केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्य व कर्मचाऱ्यांमध्ये विचार मंथन करण्यात आले. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण कसे कमी होतील यावर चर्चा करण्यात आली.

तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. माजलगाव तालुक्यातील ३९ गावांमध्ये कोरोनाचे पाचपेक्षा जास्त रूग्ण सध्या आहेत. वांगी, लवुळ, नित्रुड, बडेवाडी, चोपनवाडी, सादोळा, भाटवडगाव, चिंचगव्हान, उमरी, आबेगाव, तालखेड, लोनगावसह २८ गावांचा यात समावेश आहे. पाचपेक्षा जास्त गावात कोरोना रुग्ण आढळले असतील तर त्या गावातील ग्रामपंचायतने पंचायत समितीकडे कन्टेनमेंट झोनबाबत प्रस्ताव पाठवल्यानंतर तहसीलदारांची मान्यता घेऊन गावात कन्टेनमेंट झोन तयार करण्याचे निर्देश आहेत. पंचायत समितीने तालुक्यांतील ३९ कंटेनमेंट झोनचे प्रस्ताव पाठविले होते परंतु त्यात अनेक त्रुटी असल्याने त्यास मान्यता मिळू शकली नाही.

याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी

' कन्टेनमेंट झोन तयार करण्यास पंचायत समिती असमर्थ; ३९ प्रस्ताव अपूर्ण ' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर मंगळवारी पं.स.चे सभापती , उपसभापती ,पंस.सदस्य , गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन तास विचारमंथन केले. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण कसे कमी होतील, यावर विचार करण्यात आला. यावेळी अनेक ग्रामसेवकांसोबतही चर्चा करून रुग्णवाढीबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Brainstorming in Panchayat Samiti regarding containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.