तीन घरे फोडून १७ तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:18 AM2019-10-04T00:18:50+5:302019-10-04T00:19:17+5:30
शहरातील मध्यवस्तीतील रंगार चौक भागात गुरूवारी रोजी रात्री चोरांनी वकील, बँक कर्मचा-याच्या व एका महिलेच्या अशा तीन घरातून चोरट्यांनी नगदी १० हजार, १७ तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले.
गेवराई : शहरातील मध्यवस्तीतील रंगार चौक भागात गुरूवारी रोजी रात्री चोरांनी वकील, बँक कर्मचा-याच्या व एका महिलेच्या अशा तीन घरातून चोरट्यांनी नगदी १० हजार, १७ तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले. यात बँक कर्मचाºयाला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
शहरातील मध्यवस्ती असलेल्या रंगार चौक भागात राहणारे अॅड.अरूण आखरे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी गुरूवार रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने व १० हजार रोख रक्कम असा माल लंपास केला. येथून जवळच असलेले वैद्यनाथ बँकेचे कर्मचारी चंद्रकांत गुंडानवार यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळवून घराचे दार उघडून घरात प्रवेश केला. यावेळी गुंडानवार जागे झाले. यावेळी चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत घेऊन गेले तर तिसरी चोरी येथेच राहणाºया रूक्मीण म्हेत्रे यांच्या घरात झाली.यात गळ्यातील पोत काढून घेत चोरटे पसार झाले. या तिन्ही चोऱ्यांत १७ तोळे सोने व १० हजार नगदी रूपये चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मारहाणीत बँक कर्मचारी गुंडनवार यांना जास्त मार लागल्याने त्यांना उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक मागविले होते. मात्र याचा उपयोग झाला नाही. या प्रकरणी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा तपास पोउपनि मनीषा राठोड करीत आहेत.