अतिक्रमण हटविण्यात विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:32 AM2018-10-07T00:32:33+5:302018-10-07T00:33:15+5:30

बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत अशी मागणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने नावाला चार वेळा मोजणी केली. अतिक्रमण हटविण्याचा हा बार फुसका गेल्याने ती काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळेल का ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

Breakdown of encroachment removal | अतिक्रमण हटविण्यात विघ्न

अतिक्रमण हटविण्यात विघ्न

Next
ठळक मुद्देबीड- नगर राज्यमहामार्ग : चार वेळा मोजणी करूनही बांधकाम विभागाला मुहूर्त मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत अशी मागणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने नावाला चार वेळा मोजणी केली. अतिक्रमण हटविण्याचा हा बार फुसका गेल्याने ती काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळेल का ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
आष्टी तालुक्यातुन कडा मार्गे जाणाऱ्या बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी राज्य महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत असे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल चार वेळा मोजणी करून घेतली आणि अतिक्रमणे केलेल्या लोकांना नोटीसा बजावल्या होत्या. पण पुढे काहीच उपाययोजना राबवल्या गेल्या नसल्याने ही अतिक्रमणे आता पक्की झाली आहेत. याचा फटका वाहनधारक व प्रवासी वर्गाला सोसावा लागत आहे.
राज्य महामार्गावरील केलेली ही अतिक्रमणे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासिनता दाखवत असून, आणखी किती बळी गेल्यावर महामार्गावरील अतिक्रमणे काढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही अतिक्रमणे तात्काळ काढावीत नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे संभाजी ब्रिगेड आष्टी तालुका अध्यक्ष प्रा.भागचंद झांजे यांनी सांगितले आहे.
याबाबत आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.पी. जोरवेकर म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग लवकरच होणार असून ही सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे.
येथे आहेत अतिक्रमणे
बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अडथळा निर्माण केलेल्या तसेच चिंचपूर, मातकुळी, पांढरी, हरियाणा आष्टा फाटा, आष्टी, कासारी, कडा कारखाना, जळगाव, वटनवाडी, शेरी, कडा, साबलखेड, धानोरा, बाळेवाडी फाटा, वाघळूज, नांदूर विठ्ठलाचे या ठिकाणी अतिक्रमणे केलेल्या ११०० लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पण अतिक्रमणे हटविण्यात नेमका अडथळा कशाचा निर्माण होतो हेच कळत नाही. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारती उभ्या असल्याने हे काढताना मोठे राजकारण आडवे येत आहे.

Web Title: Breakdown of encroachment removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.