जनजागृतीमुळे एचआयव्ही संसर्गाला बीड जिल्ह्यात ‘ब्रेक’; टक्का नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:00 AM2017-12-01T00:00:20+5:302017-12-01T00:00:26+5:30
एचआयव्ही म्हटले की, माणूस दोन पावले मागे सरकतो. हा आजार जडलेल्या व्यक्तीला उपेक्षेच्या दृष्टीने पाहिले जाते; परंतु समाजाच्या दृष्टीत या रुग्णांना मानसन्मान देण्याबरोबरच एड्सग्रस्तांची जिल्ह्यातील टक्केवारी कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला यश येत आहे. प्रभावी जनजागृती, समुपदेशन व उपाययोजना हेच टक्केवारी घसरण्याचे मुख्य उपचार ठरले. एचआयव्ही संसर्गाची आठ वर्षांपूर्वी ५.५ असणारी टक्केवारी आता ०.७७ पर्यंत आली असून, तिची शून्याकडे वाटचाल सुरु आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एचआयव्ही म्हटले की, माणूस दोन पावले मागे सरकतो. हा आजार जडलेल्या व्यक्तीला उपेक्षेच्या दृष्टीने पाहिले जाते; परंतु समाजाच्या दृष्टीत या रुग्णांना मानसन्मान देण्याबरोबरच एड्सग्रस्तांची जिल्ह्यातील टक्केवारी कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला यश येत आहे. प्रभावी जनजागृती, समुपदेशन व उपाययोजना हेच टक्केवारी घसरण्याचे मुख्य उपचार ठरले. एचआयव्ही संसर्गाची आठ वर्षांपूर्वी ५.५ असणारी टक्केवारी आता ०.७७ पर्यंत आली असून, तिची शून्याकडे वाटचाल सुरु आहे.
एचआयव्ही (एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम) या संसर्गजन्य रोगाबद्दलची जनजागृती आणि उपाययोजनेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने उचललेली पावले योग्य वाटेने पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष (डापकू) सध्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन यावर जनजागृती करताना दिसून येत आहे. त्यांचे हे परिश्रमच एचआयव्ही बाधितांचा टक्का कमी करण्यास मदत करीत आहेत.
डापकूमध्ये आल्यानंतर रुग्णांची तपासणी केली जाते. एआरटी सेंटरमध्ये त्याला गोळ्या दिल्या जातात, तसेच त्याचे समुपदेशन करून आधार दिला जातो. यामुळे संबंधित रुग्णाचे मनोबल वाढून आजारावर मात करण्यासाठी तो संघर्ष करतो. रुग्णाचा संघर्ष व रुग्णालयाचे परिश्रम आठ वर्षांपूर्वीची टक्केवारी सद्य:स्थितीत शून्याच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करीत आहे.
अपु-या मनुष्यबळावर यशस्वी कामगिरी
डापकोमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा पर्यवेक्षक यासह इतर तीन पदे आहेत. त्यापैकी दोन रिक्त असून, इतर ठिकाणीही अपुरे मनुष्यबळ असल्याने येणाºया अडचणींवर मात करीत डापकूने हे यश संपादन केले आहे.
बीड, अंबाजोगाईमध्ये एआरटी सेंटर
एड्स ग्रस्तांसाठी जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एआरटीची सुविधा आहे. येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. गेवराई, परळी, माजलगाव, केज, धारूर, चिंचवण असे सहा लिंक एआरटीची सुविधा उपलब्ध आहे.
एचआयव्हीबाधित मातांची मुले जन्मली निगेटिव्ह
२०११ ते मे २०१७ पर्यंत जिल्हा रुग्णालयात एचआयव्ही बाधित २९४ मातांची २३७ मुले निगेटिव्ह जन्मल्याचे समोर आले आहे. दहा वर्षांत केवळ ३१ बालके पॉझिटिव्ह असून, त्यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन वर्षांत एकाही बालकाचा मृत्यू झाला नाही हे विशेष. प्रत्येक वर्षी किमान १० हजार महिलांची प्रसूती रुग्णालयात होते.
मोहिमेला गतिमान करण्यासाठी प्रयत्नांची गरज
एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जनजागृती मोहिमेला अधिक गतिमान करण्याची गरज आहे. यासाठी डापकू प्रशासनाने आलेल्या निधीचा पुरेपूर विनियोग प्रभावी जनजागृती व उपचारासाठी करावा.