नियमाचा भंग करत आंदोलन करणे भाजप कार्यकर्त्यांना पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 07:50 PM2020-06-23T19:50:12+5:302020-06-23T19:50:38+5:30

भाजपाच्या पस्तीस कार्यकर्त्यावर केज पोलिसात गुन्हा दाखल

Breaking the rules and agitating cost BJP workers in Kaij | नियमाचा भंग करत आंदोलन करणे भाजप कार्यकर्त्यांना पडले महागात

नियमाचा भंग करत आंदोलन करणे भाजप कार्यकर्त्यांना पडले महागात

Next

केज : तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी केज तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी सोशल डिस्टनसिंग नियमाचा भंग करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखने व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधक कायदा आणि पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पस्तीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांना  हे आंदोलन चांगलेच महागात पडल्याची चर्चा आहे.

सोमवार दि.२२ जून रोजी सकाळी १०:३० वा च्या दरम्यान शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करिता नुकसान भरपाई देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी. या आणि इतर मागण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून धरणे दिली होती. 

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आंदोलनादरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरविण्याचा संभव होऊ शकतो हे माहीत असताना देखील आंदोलकांनी स्वतःच्या जीवाची व इतरांच्या जीवाची पर्वा न करता सोशल डिस्टनसिंगचे पालन न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि तहसील आवारात बेकायदेशीर गर्दी जमविली म्हणून पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख यांच्या फिर्यादी नुसार तालुका अध्यक्ष भगवान केदार, नंदकिशोर मुंदडा, रमाकांत मुंडे, जिल्हा परिषदप सदस्य विजयकांत मुंडे, विष्णू घुले, सुनिल घोळवे, अजय मुळे, शरद इंगळे, राहुल गदळे, सुरेश आंधळे, गोरख गित्ते, संदीप पाटील, शिवदास थळकरी, कैलास जाधव, विठ्ठलराव शिंदे, संतोष देशमुख, बिभीषण भोसले, अविनाश साबळे, संतोष जाधव, रामराजे तांबडे, सुरेश घोळवे, अतुल इंगळे, खदिर कुरेशी, अर्जुन बनसोडे, विक्रम डोईफोडे, शशिकांत थोरात, काकासाहेब पाळवदे, पांडुरंग भांगे, धनराज साखरे, वैजनाथ तांदळे, विठ्ठल पारखे, शिवाजी भिसे, अंकुश जोगदंड, प्रकाश मुंडे आणि प्रकाश बाळमे या पस्तीस कार्यकर्त्या विरोधात गु. र. नं. २३२/२०२० भा. दं. वि. १८८, २६९, २७०, ३४ सह पोलीस अधिनियम १७ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Breaking the rules and agitating cost BJP workers in Kaij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.