मयत शेतकऱ्याच्या वारसाला फेरफारसाठी मागितली लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:22+5:302021-02-05T08:20:22+5:30

माजलगाव : मयत शेतकऱ्याच्या वारसाला फेरफारसाठी लाच मागणाऱ्या तलाठी पतीवर गुन्हा नोंदविण्याची तसेच तलाठ्यास निलंबित करण्याची मागणी शेकापने तहसीलदारांकडे ...

Bribe demanded for change in inheritance of deceased farmer | मयत शेतकऱ्याच्या वारसाला फेरफारसाठी मागितली लाच

मयत शेतकऱ्याच्या वारसाला फेरफारसाठी मागितली लाच

Next

माजलगाव : मयत शेतकऱ्याच्या वारसाला फेरफारसाठी लाच मागणाऱ्या तलाठी पतीवर गुन्हा नोंदविण्याची तसेच तलाठ्यास निलंबित करण्याची मागणी शेकापने तहसीलदारांकडे केली आहे.

तालुक्यातील छत्र बोरगाव येथील तलाठी पी. बी. आठवले यांचा कारभार त्यांचे पती सूरज हे पाहत असतात. बुधवारी छत्र बोरगाव येथील शेतकरी राजेभाऊ रामभाऊ जाधव हे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे न्यायालयातून मिळालेल्या वारस प्रमाणपत्र आधारे ७/१२ पत्रकावर नाव नोंदण्यासाठी, फेरफार नोंदणीसाठी तलाठी आठवले यांच्या कार्यालयात गेले असता तेथे दोघे पती - पत्नी हजर होते. राजेभाऊ जाधव यांनी न्यायालयाचे प्रमाणपत्र देऊन नाव सातबारा पत्रकाला नोंदविण्याची विनंती केली असता, तलाठी आठवले यांनी त्यांच्या पतीला भेटा असे सांगितले. तेव्हा सूरज रक्षे यांनी तुम्हाला आठ हजार रुपये द्यावे लागतील, आज नगदी चार हजार रुपये द्या व आठ दिवसांनंतर चार हजार रुपये द्या, अशी मागणी केली. त्यावर राजेभाऊ जाधव यांनी त्यांना चार हजार रुपये दिले. यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे भाई ॲड. नारायण गोले पाटील यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी या शेतकऱ्याला घेऊन तहसील कार्यालय गाठले. तलाठ्यास निलंबित करून तलाठी पतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेकापचे भाई ॲड. नारायण गोले पाटील, राजेभाऊ जाधव, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण, आदींनी दिला.

Web Title: Bribe demanded for change in inheritance of deceased farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.