बीडमध्ये ट्रकचे टायर चोरणा-या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:45 AM2018-02-06T00:45:49+5:302018-02-06T00:46:30+5:30

महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणाºया टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी नगर रोडवरील बालेपीर भागात करण्यात आली. त्यांच्याकडून एका पिकअप वाहनासह दोन लाख रुपये किंमतीचे टायरही जप्त केले आहेत.

The bribe of the truck's Tire Chorana band in Beed | बीडमध्ये ट्रकचे टायर चोरणा-या टोळीचा पर्दाफाश

बीडमध्ये ट्रकचे टायर चोरणा-या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देदोन लाखांच्या टायरसह पिकअप जप्त; तीन गुन्हे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणाºया टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी नगर रोडवरील बालेपीर भागात करण्यात आली. त्यांच्याकडून एका पिकअप वाहनासह दोन लाख रुपये किंमतीचे टायरही जप्त केले आहेत.

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या सुचनेवरून सध्या शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. रविवारी पहाटेही वाहतूक शाखेचे पथक गस्त घालत होते. याचवेळी बालेपीर भागात त्यांना एका पीकअपमधून टायर घेऊन जाणारे पिकअप दिसले. त्यांनी हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. चौकशी करीत असतानाच पिकअपमधील चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र ते मिळून आले नाहीत.

रविवारी दिवसभर या चोरट्यांचा शोध घेण्यात आला. सायंकाळच्या सुमारास शेख इलियास हा त्याच्या घरी लपल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती घेतली जात असून त्याचे साथिदार हे शेजारील जिल्ह्याचे असल्याचे सांगण्यात आले. पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, तुळशीराम जगताप, शेख नसीर, प्रसाद कदम, सतीश कातखडे, नरेंद्र बांगर आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

त्या चार कर्मचाºयांचा होणार सत्कार
गस्तीदरम्यान वाहन पकडणाºया वाहतूक शाखेच्या रविंद्र नागरगोजे, मच्छिंद्र कप्पे, नितीन काकडे, महादेव बाबासाहेब सानप या चार कर्मचाºयांचा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

इलियासला टायरची माहिती
पोलिसांनी ताब्यात घेतलेला शेख इलियास हा पूर्वी हैदराबाद येथील आॅईलच्या कंपनीत होता. याठिकाणी टायर जाळून आॅईल काढले जात होते. त्यामुळे त्याला टायरची सर्व माहिती होती.
यामध्ये भरपूर पैसा असल्याचे त्याला माहिती होते. त्यामुळेच त्याने इतर साथिदारांच्या सहाय्याने टायर चोरीचा व्यवसाय निवडला.

Web Title: The bribe of the truck's Tire Chorana band in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.