जिल्ह्यात 16 पोलिसांनी घेतली लाच, खाकी वर्दीवर भ्रष्टाचाराचा डाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 04:12 PM2022-01-21T16:12:22+5:302022-01-21T16:12:52+5:30

नागरिकांचे रक्षण, गुन्ह्यांचा तपास व कायदा-सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पोलिसांना कर्तव्य निभवावे लागते. मात्र, पोलीसदेखील समाजाचाच घटक असल्याने मोह, माया व प्रलोभनापासून ते दूर नाहीत.

Bribes taken by 16 police in the district, corruption stains on khaki uniforms in beed | जिल्ह्यात 16 पोलिसांनी घेतली लाच, खाकी वर्दीवर भ्रष्टाचाराचा डाग

जिल्ह्यात 16 पोलिसांनी घेतली लाच, खाकी वर्दीवर भ्रष्टाचाराचा डाग

Next

बीड : पोलीस... कायदा-सुव्यवस्था राबविण्याची मुख्य जबाबदारी असलेला घटक. मात्र, पैशाच्या माेहापायी अनेकदा अंगावर वर्दी चढविताना घेतलेल्या शपथेचा विसर पडतो. जिल्ह्यात तीन वर्षांत १६ पोलिसांना लाच घेताना अटक झाली, त्यामुळे खाकी वर्दीवरील लाचखोरीचा डाग पुसण्याचे आव्हान कायम आहे.

नागरिकांचे रक्षण, गुन्ह्यांचा तपास व कायदा-सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पोलिसांना कर्तव्य निभवावे लागते. मात्र, पोलीसदेखील समाजाचाच घटक असल्याने मोह, माया व प्रलोभनापासून ते दूर नाहीत.

पोलीस दलातील हप्तेखोरीची चर्चा हमखासच होते. मात्र, इतर विभागापेक्षाही लोकांना पोलिसांकडून अधिक अपेक्षा आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतीलच अधिकारी- कर्मचारी लाचखोरी करत असतील तर पारदर्शक कारभाराची अपेक्षा इतर विभागाकडून कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत १६ पोलीस लाचेच्या सापळ्यात अडकले. यात सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते अंमलदारापर्यंतचा समावेश आहे.

सर्वांचीच हकालपट्टी

दरम्यान, पोलीस दलात एसीबी कारवाईची मोठी दहशत असते. या कारवाया खूपच गांभीर्याने घेतात. लाचखोरीत पकडलेल्या सर्वच्यासर्व १६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारण्यात आलेला आहे.

कोणत्या वर्षात किती पोलिसांवर कारवाया?
२०१९ - ०४
२०२० - ०७
२०२१ - ०५

लाचखोरीत पोलीस दोन नंबरवर

लाचखोरीत महसूलचा अव्वल क्रमांक असून पोलीस दुसऱ्या नंबरवर आहेत. २०२० मध्ये महसूलचे लाचखोरीचे सहा तर पोलीस विभागाचे पाच गुन्हे नोंद झाले तर, २०२१ मध्ये महसूलचे पाच व पोलीस विभागाचे तीन गुन्हे नोंदविण्यात आले.

कुणी लाच मागत असेल तर, येथे संपर्क करा

कुणी लोकसेवक लाचेची मागणी करत असेल तर

दूरध्वनी क्र. ०२४४२ - २२२६४९, मो. ९१५८९९९०९१ येथे संपर्क करा किंवा

टोल फ्री क्र. १०६४ यावरदेखील तक्रार कळवा, असे आवाहन एसीबीचे उपअधीक्षक भारत राऊत यांनी केले आहे.

Web Title: Bribes taken by 16 police in the district, corruption stains on khaki uniforms in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.