वीट उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:53+5:302021-04-01T04:33:53+5:30

अंबाजोगाई : वीट उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या राखेचे दर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ...

Brick producers in trouble | वीट उत्पादक अडचणीत

वीट उत्पादक अडचणीत

Next

अंबाजोगाई : वीट उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या राखेचे दर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे वीट उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अगोदरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीट उत्पादनांचा व्यवसाय संकटात सापडलेला असताना वाढीव भावामुळे व्यवसाय मंदावले आहेत. अशा स्थितीत शासनाने राखेचे भाव नियंत्रित ठेवावेत, अशी मागणी वीट उत्पादक व्यावसायिकांकडून होत आहे.

वाढीव वीजदर कमी करण्याची मागणी

अंबाजोगाई : कोरोनाच्या संक्रमण काळात महावितरणच्या वतीने छुप्या पद्धतीने वीज दर वाढविण्यात आले आहेत. वीज बिलांच्या रकमा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. शासनाने कोरोनाच्या काळात वीज बिल तर माफ केलेच नाही. उलट वाढीव दर ठरवून वीज आकारणी सुरू केली आहे. वाढते वीज बिल ग्राहकांना परवडणारे नाही. यासाठी रीडिंगप्रमाणे बिल देऊन इतर अधिभार रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.

कोरोनामुळे व्यापाऱ्यांना फटका

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली असली तरी शहरातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत.

बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात बस वाहतूक सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात रुग्णालयात येण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध नाही. इतर वाहनांनाही बंदी करण्यात आल्याने व बसफेऱ्या बंद असल्याने रुग्णालयापर्यंत जायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे. बसफेऱ्या बंद झाल्याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसू लागला आहे.

कामे उपलब्ध करून द्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून शेतकरी व शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, सध्या रब्बी हंगाम संपुष्टात आल्याने शेतमजुरांना कामे नाहीत. त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे शहरी भागातीलही बांधकाम व विविध व्यवसाय बंद झाल्याचा मोठा फटका मजूर वर्गाला बसत आहे. यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धायगुडे यांनी केली आहे.

Web Title: Brick producers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.