पात्रुड जवळील पूल ठरतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:14+5:302021-06-16T04:45:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यातील पात्रुड-जीवनापूर रोडवरील पात्रुड जवळील पुलाचे गेल्या दीड वर्षांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील पात्रुड-जीवनापूर रोडवरील पात्रुड जवळील पुलाचे गेल्या दीड वर्षांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या पुलाचे काम सुरू झाले परंतु ते अर्धवट आहे. यामुळे हा पूल अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसाने पुलावरुन पुराचे पाणी वाहिले. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
पात्रुड-जीवनापूर राज्य रस्त्याचे काम
अनेक महिने रखडल्यानंतर चार महिन्यापूर्वी हे काम पूर्ण झाले. तर पात्रुड जवळील पुलाचे काम चालू होऊन दीड वर्षे झाले. अर्धवट पूल होताच हे काम संबंधित गुत्तेदाराने थांबवले आहे. यामुळे या रस्त्यावर येणाऱ्या गावातील नागरिकांना पावसाळ्यात या ठिकाणाहून जाण्यास कसरत करावी लागते. या पुलावरुन बेलुरा, आलापूर, लोणगाव, जीवनापूर, देवळासह अनेक गावातील नागरिकांना जावे लागते. या पुलाचे अर्धवट काम झाले असल्याने याठिकाणी दररोज होत आहेत. याठिकाणाहून जाताना वाहन चालकास कसरत करावी लागते.
.....
सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष
रविवारी झालेल्या पावसामुळे येथे पूर आला. यामुळे या अर्धवट पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावचा इतर गावाशी संपर्क तुटला होता. याबाबत या भागातील नागरिकांनी आमदार सोळंके व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. तरीही या कामाबाबत कसल्याच प्रकाराची दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. तरी या पुलाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी होत आहे.
===Photopath===
140621\purusttam karva_img-20210614-wa0034_14.jpg
===Caption===
पात्रुड-जिवनपूर मार्गावर पात्रुडजवळ अर्धवटस्थितीत असलेला पूल.