‘बीड जिल्ह्याची चांगली ओळख निर्माण करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:30 AM2018-10-09T00:30:37+5:302018-10-09T00:31:52+5:30
गत ५० वर्षात जिल्ह्याचा विकास झाला नाही म्हणून एकही खाजगी कारखाना निर्माण झाला नाही अथवा एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. बेरोजगारांना काम मिळाले नाही. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी या परिवर्तनाच्या संघर्षात सक्रियपणे सहभाग घेऊन एक चांगला जिल्हा म्हणून बीडची ओळख निर्माण करावी असे आवाहन शिवसंग्रामचे राष्टÑीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गत ५० वर्षात जिल्ह्याचा विकास झाला नाही म्हणून एकही खाजगी कारखाना निर्माण झाला नाही अथवा एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. बेरोजगारांना काम मिळाले नाही. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी या परिवर्तनाच्या संघर्षात सक्रियपणे सहभाग घेऊन एक चांगला जिल्हा म्हणून बीडची ओळख निर्माण करावी असे आवाहन शिवसंग्रामचे राष्टÑीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केले.
तालुक्यातील कपिलधार येथे शिवसंग्रामच्या वतीने बुथ कमिटी प्रमुख व कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मेटे यांनी हे आवाहन केले. व्यासपीठावर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. मेटे म्हणाले, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून राजकीय व सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे आहे. वंचित, गरजू, सामान्यांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे व प्रदेश महिला आघाडी प्रमुख दीपाली सय्यद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी केले. यावेळी प्रा.ए.आर. पाटील, भाऊसाहेब आजबे, शैलेश सरकटे, विराज जोगदंड (औरंगबाद), सुवर्ण कोकण उपक्रमाचे सतीश परब, विद्यार्थी आघाडीचे अविनाश खापे आदी उपस्थित होते.