शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी बीडमध्ये बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:33 AM2021-02-13T04:33:31+5:302021-02-13T04:33:31+5:30
केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे सुरू केले आहे. मोदी सरकार उद्योपतींच्या हिताचे निर्णय घेत ...
केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे सुरू केले आहे. मोदी सरकार उद्योपतींच्या हिताचे निर्णय घेत आले असून, या सरकारला शेतकऱ्यांशी देणे घेणे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे अवघड होणार असून, मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करीत कटकारस्थाने रचण्यात येत आहे. जोपर्यंत कृषी कायदे मागे घेण्यात येणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये बैलगाडी रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी कृषी कायदे मागे घेण्यात यावे, स्वामिनाथन आयोग लागू करावा, इंधनाचे दर आटोक्यात आणावेत, आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.