बीडमधील गजबजलेल्या अंबिका चौकात सकाळी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:44 AM2017-12-27T00:44:26+5:302017-12-27T00:44:33+5:30

मागील काही दिवसांपासून शहरात चोºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याने बीडकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्यानंतर मोंढ्यात दोन दुकाने फोडली. त्यानंतर आता गजबजलेल्या पांगरी रोडवरील अंबिका चौकात सकाळी नऊ वाजताच महिला प्राध्यापिकाचे घर फोडून दहा हजार रुपये रोख व दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

Bumblebee in the beating of Amboli Chowk in Beed | बीडमधील गजबजलेल्या अंबिका चौकात सकाळी घरफोडी

बीडमधील गजबजलेल्या अंबिका चौकात सकाळी घरफोडी

googlenewsNext
ठळक मुद्देदागिन्यांसह रक्कम लंपास

बीड : मागील काही दिवसांपासून शहरात चोºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याने बीडकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्यानंतर मोंढ्यात दोन दुकाने फोडली. त्यानंतर आता गजबजलेल्या पांगरी रोडवरील अंबिका चौकात सकाळी नऊ वाजताच महिला प्राध्यापिकाचे घर फोडून दहा हजार रुपये रोख व दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील पांगरी रोडवरील अंबिका चौक म्हणजे एक मिनी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे भाजीपाल्यापासून ते कपड्यापर्यंत सर्वच वस्तू भेटतात. तसेच या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. एवढी वर्दळ असतानाही चौकाच्या डाव्या बाजूला असणाºया अपार्टमेंटमध्ये सकाळी ९ वाजताच चोरट्यांनी महिला प्राध्यापिका संध्या शिंदे यांचे घर फोडले. त्यांचे पती गोरख शिंदे हे कार चालक आहेत.

गोरख शिंंदे हे सकाळी आठ वाजताच परभणीला गेले होते. तर नऊ वाजता प्रा.संध्या शिंदे या महाविद्यालयात गेल्या होत्या. सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचा इयत्ता दहावी शिक्षण घेणारा मुलगा प्रमोद हा जेवण्यासाठी घरी आला. त्याला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने तात्काळ नातेवाईक व आई-वडिलांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदेसह शिवाजीनगर ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भुषन सोनार यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

दरम्यान, दिवाळी सणात अपवादात्मक किरकोळ चोरी वगळता सर्वत्र शांतता होती. त्यानंतरही काही महिने चोºया झाल्या नाहीत. यामुळे बीड पोलिसांचे स्वागत होत होते. परंतु आता पुन्हा मागचे पाढे पंचवन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सारडा नगरीत तीन तर विद्यानगर भागात एक घरफोडी झाली होती. त्यानंतर दुसºयाच दिवशी मोंढा भागात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून ऐवज लंपास केला होता. त्यानंतर माजलगाव, अंभोरा व गेवराईमध्ये चोरीच्या घटना घडल्या.

या चोरीचा तपास सुरू असतानाच पुन्हा मंगळवारी सकाळी नऊ वाजताच प्रा.संध्या शिंदे यांचे घर फोडून ऐवज लंपास केला.
या वाढत्या चोरींमुळे पुन्हा एकदा पोलिसांचा वचक कमी झाला की काय? अशी चर्चा सर्वसामान्यांमधून ऐकावयास मिळत आहे. या चोरींचा तपास लावून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बीडकरांमधून होत आहे.

रात्री गस्त; दिवसा चोरी
पोलिसांच्यावतीने रात्रभर गस्त घातली जात आहे. चोरीसह इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रात्रीच्यावेळी चोरी बंद करून चोरट्यांनी आता भरदिवसा चोरी करणे सुरू केले आहे. रात्रीची जबाबदारी पोलिसांची असली तरी दिवसातरी नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी चोरी होणे म्हणजे नागरिक व पोलिसांसाठी हे आव्हान आहे.
नागरिकांनो, तुम्हीच घ्या काळजी
मोंढ्यातील दोन चोरी वगळता इतर सर्व चोºया कुलूप तोडून झालेल्या आहेत. सारडा नगरीतील कोंडे अतिशय निकृष्ट असल्याने चोरट्यांना ते तोडणे सोपे झाले. अशीच परिस्थिती विद्यानगर भागातील होती. तसेच प्रा.शिंदे यांच्या घराचे कुलूपही अतिशय कमकुवत होते. त्यामुळे नागरिकांनी घराचे कडी-कोंडा व कुलूप चांगले बसवून घ्यावेत व होणा-या घटना टाळाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

शक्य असल्यास सीसीटीव्ही बसवा
चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे घराजवळ बसवून घेणे गरजेचे आहे. एकट्यात शक्य नसल्यास किमान कॉलनीत वर्गणी करून कॅमेरे बसविणे गरजेचे आहेत. यामुळे घटनांना नक्कीच आळा बसेल. किंवा अपघाताने घटना घडलीच तर त्याचे चित्रीकरण होऊन पोलिसांना तपास लावण्यात सोप होऊ शकते. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: Bumblebee in the beating of Amboli Chowk in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.