अंबाजोगाईत घरफोडी; ५६ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:32 AM2021-05-15T04:32:58+5:302021-05-15T04:32:58+5:30
बाळासाहेब ज्ञानोबा भांगे (रा. वांगदरी ता.अंबोजाई) हे जेसीबी व्यावसायिक सध्या अंबाजोगाई शहरातील विद्याकुंज कॉलनीत किरायाने राहतात. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे ...
बाळासाहेब ज्ञानोबा भांगे (रा. वांगदरी ता.अंबोजाई) हे जेसीबी व्यावसायिक सध्या अंबाजोगाई शहरातील विद्याकुंज कॉलनीत किरायाने राहतात. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे भांगे कुटुंबीय अंबाजोगाई येथील घराला कुलूप लावून गावाकडे गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी १२ मे रोजी रात्री ७ ते शुक्रवारी सकाळी ९ वा.दरम्यान कधीतरी त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, शिलाई आणि पिको मशीन, वाॅटर प्युरिफायर, भांडे आणि टीव्ही असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. शुक्रवारी भांगे यांच्या मित्राने त्यांना चोरीची माहिती दिली. याप्रकरणी बाळासाहेब भांगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, चोरीच्या दरम्यान दोन युवक भांगे यांच्या घरासमोरून सलग तीन दिवसांपासून चकरा मारत होती, अशी माहिती शेजारच्या महिलेने भांगे यांना दिली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.